Shivendraraje Bhosale, Udayanraje Bhosale
Shivendraraje Bhosale, Udayanraje Bhosale sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara : उदयनराजेंच्या आघाडीने सातारा पालिका लुटून खाल्ली : शिवेंद्रसिंहराजेंची टीका

Umesh Bambare-Patil

Shivenraraje Bhosale News : खासदार उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale यांच्या सातारा विकास आघाडीच्या नगरसेवकांनी गेल्या पाच वर्षात सातारा पालिका Satara Palika अक्षरश: लुटून खाल्ली. त्यांच्या नगरसेवकांत तुला जास्त मिळतंय की मला अशी स्पर्धा लागली होती, अशी जहरी टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उदयनराजेंच्या सातारा विकास आघाडीवर केली आहे.

सातारा पालिकेत बैठकीनंतर आमदार भोसले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, पालिकेच्या निवडणुकीत खासदार साहेबांनी साातारकरांना अनेक सुंदर स्वप्ने दाखवली होती. पण, सातारकराचे स्वप्नभंग झाले आहे. नगराध्यक्षांना काम करण्याची मुभा नव्हती, स्वातंत्र्य नव्हते.

सर्वसामान्य घरातील स्त्री या नावाखाली नगराध्यक्षांना पालिकेत काम करण्याची संधी देणार असे सांगून उमेदवारी दिली होती. त्यातूनच त्यांना सातारकरांनी निवडून दिले. पण, गेल्या पाच वर्षात नुसते खाणे या पलिकडे काहीही झाले नाही. अख्खी नगरपालिका पाच वर्षात सातारा विकास आघाडीच्या नगरसेवकांनी लुटून खाल्ली आहे. उलट त्यांच्यात शर्यत लागली होती की तुला जास्त मिळतंय की मला.

गेल्या पाच वर्षात पालिका कोणताही मोठा प्रकल्प राबवू शकली नाही. तसेच कोणताही प्रकल्प पूर्ण करु शकली नाही. ही कामे देताना ठेकेदारांकडून व कंपन्यांकडून आधीच पैसे घेतले होते. त्यामुळे त्यांचे कोणीही ऐकायला तयार नाहीत, असा टोलाही शिवेंद्रसिंहराजेंनी लगावला आहे.

परवानगी घेऊनच फ्लेक्स

फ्लेक्सबाबत उच्च न्यायालयाच्या निर्णयाची सातारा पालिकेने अंमलबजावणी करावी. माझ्या वाढदिनीही परवानगी घेऊनच फ्लेक्स लावले जातील, असे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT