Uddhav Thackeray sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Mahapalika Election Results: मुंबई गमावलेल्या उद्धव ठाकरेंवर मोठी नामुष्की; 'या' मोठ्या महापालिकेत एकही नगरसेवकाला मशाल पेटवताच आली नाही

Sangli Election Results 2026 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा आपल्या दमदार नेतृत्वाच्या जोरावर महाराष्ट्रात भाजपचा झेंडा फडकवला आहे. मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिकसह 24 महापालिकांवर भाजपची सत्ता आणली आहे.

Deepak Kulkarni

Mumbai News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा आपल्या दमदार नेतृत्वाच्या जोरावर महाराष्ट्रात भाजपचा झेंडा फडकवला आहे. मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिकसह 24 महापालिकांवर भाजपची सत्ता आणली आहे. यामुळे राज्यात विधानसभा, नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुकानंतर पुन्हा एकदा भाजपच नंबर वन ठरला आहे. पण याचउलट उद्धव ठाकरेंवर मुंबई महापालिका गमावल्यानंतर आणखी एक मोठी नामुष्की ओढावली आहे.

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेत भाजप एकूण 78 जागांपैकी 39 जागा जिंकत सत्तेच्या काठावर जाऊन थबकली आहे. काँग्रेस 18,अजित पवारांच्या राष्ट्रवादी 16 तर शरद पवार राष्ट्रवादी 3 जागा, एकनाथ शिंदेंच्या शिवसेना 2 जागा जिंकल्या. पण या महापालिकेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला भोपळाही फोडता आला नसल्याची माहिती समोर येत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगली,मिरज आणि कुपवाड महानगरपालिका निवडणुकीसाठी झंझावाती प्रचार केला होता. त्यांच्या कष्टाला मोठं यश मिळवत भाजपनं या तीनही महानगरपालिकांमध्ये स्पष्ट बहुमताकडे पाऊल टाकलं आहे. मुंबई महापालिका गमावल्यानंतर उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

गेल्या महानगरपालिकेतही भाजप स्वबळावर सत्तेत होता. त्या निवडणुकीत भाजपनं तब्बल 41 जागा जिंकल्या होत्या. यानंतर दोन अपक्षांच्या पाठिंब्यासह 43 जागांसह भाजपनं सत्ता स्थापन केली होती. यंदाही या निवडणुकासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी चांगलाच जोर लावला होता. त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर जयश्री पाटील आणि पृथ्वीराज पाटील या दोन काँग्रेस नेत्यांना पक्षात घेऊन काँग्रेसला धक्का दिला होता.

सांगली महानगरपालिका निवडणुकीत भाजपच्या मातब्बरांना धक्का बसला आहे. माजी आमदार दिनकर पाटील यांच्यासह पृथ्वीराज पवार यांच्या निकटवर्तीयांचा पराभव झालेला आहे. पराभूत झाले.

एवढंच नव्हे तर भाजप शहराध्यक्ष प्रकाश ढंग यांना पराभवाचा धक्का बसला. खासदार विशाल पाटलांचे पुतणे यांच्यासह संपूर्ण पॅनेलच विजयी झाले आहेत. श्रीमती जयश्री पाटील यांचे कट्टर समर्थकही पराभूत झाल्यामुळे या निवडणुकीत धक्कादायक निकालाची नोंद झाल्याचं पाहायला मिळालं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT