Chandrahar Patil, Uddhav Thackeray Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Uddhav Thackeray News : उद्धव ठाकरेंचा काँग्रेसला धक्का, ‘वसंतदादां’ना अभिवादन अन् चंद्रहार पाटलांची उमेदवारी...

Anil Kadam

Sangli News : सांगली लोकसभेच्या जागेवरुन महाविकास आघाडीत तिढा वाढलेला असताना शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी वसंतदादा पाटील यांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर मिरजेतील सभेत डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करीत काँग्रेसला धक्का दिला. सांगलीच्या गौरवशाली इतिहासाचे पाईक असाल तर चंद्रहार विजयी झालाच पाहिजे. मातीतला मर्द दिल्लीत पाठवायचा आहे, त्याची जबाबदारी सांगलीकरांनी घ्यावी, असे आवाहनही ठाकरे यांनी केले. दरम्यान भाजपने शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस फोडली आता महाराष्ट्र लुटायला आला आहे. पण महाराष्ट्र लुबाडला तर औरंगजेबाप्रमाणे मूठमाती देवू, असा इशाराही त्यांनी दिला.

मिरज येथील कोळेकर मठात शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने आयोजित केलेल्या जनसंवाद मेळाव्यात पक्षप्रमुख ठाकरे यांची तोफ धडाडली. यावेळी खासदार संजय राऊत, आमदार वैभव नाईक, तेजस उद्धव ठाकरे, संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानुगडे-पाटील मिलींद नार्वेकर, जिल्हाप्रमुख संजय विभुते, अभिजीत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

पक्षप्रमुख ठाकरे म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी रोवलेली बीजे वाया गेली नाहीत. आरएसएसला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत, मात्र ऐवढया वर्षानंतरही त्यांच्या बिजाला अंकुरच नाही. कचरा गोळा करणार्‍या गाडीसारखी अवस्था झाली आहे. मातीशी बेईमानी करणारी प्रवृत्ती आली आहे. काही वेळेस निवड चुकली. काही लोक भस्मासुरासारखी खात राहिली. ज्यांना सेनेने खूप काही दिले, मात्र ईडी, सीबीआयच्या भीतीपोटी पळाले. शिवसेनेने दिले नसते तर तुम्ही असता काय? कुंडली आहे, दाब देणार पण उपयोग नाही. आता तुमचा पराभवच होणार यात तीळमात्र शंका नाही. कोल्हापुरात जावून शाहू महाराजांना शब्द दिला. मोठा निर्णय घेतल्याने कोल्हापूरकर विजयी करतील.

वसंतदादा समाधीवर जावून दर्शन घेतले. दादा आणि बाळसाहेब ऋणानुबंध मोठे आहेत. बाळासाहेबांनी महाराष्ट्राच्या चाव्या घ्या असे सांगितले होते, त्यानंतर काही महिन्यातच वसंतदादा मुख्यमंत्री झाले. पक्ष वेगळे पण सुडाचे राजकारण करत नव्हते. सुडबुद्धीने राजकारण करत नव्हते. मंदिर खोली बाळासाहेबांची तेथील आश्वासन मोडले व मलाच खोटे ठरवू लागले, म्हणून मैदानात उतरलो. गद्दारी महाराष्ट्रातील मातीशी आणि जनतेशी केली जाते.

मोदी, अमित शहांचा समाचार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा सेना पक्षप्रमख ठाकरे यांनी समाचार घेतला. ते म्हणतात, तुमच्या सात पिढ्यांचा इतिहास सांगा. पण मला अभिमान आहे. मी ठाकरे घराण्याचा सात पिढ्यांचा इतिहास सांगतो. तुम्ही सात पिढ्यांचा इतिहास सांगा, असे आव्हानही उद्धव ठाकरे यांनी दिले. मी मन की नाही जन की बात करतो, असा टोला लगावला. जर आता महाराष्ट्र लुटणार असाल तर महाराष्ट्र फोडणार असाल तर सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

‘पहाडी मुलखात मरहठ्ठे भारी’

दुसर्‍यांची संपत्ती चोरतो. तु कसला मर्द रे. न्यायालयाने सुनावले मतदारांची चेष्टा नव्हे काय? जनता सर्वोच्च न्यायालयात दाद मागतोय पण ते वेळेत द्या. चिन्हाचा वापर न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत आहे, याचा उल्लेख आवश्यक आहे. ज्या निकषावर लबाड राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला. त्यांनाही सुचना लिहिण्यास भाग पाडा. मिंधे व नार्वेकर जनतेत जाऊन सांगा. जनता सांगेल ते मान्य. उघड उघड लोकशाहीचा खून करतात. ‘पहाडी मुलखात मरहठ्ठे भारी’ असा हल्लाबोलही ठाकरे यांनी केला. चारशे पार करण्याचा नारा दिला जात आहे, म्हणजे ते खुर्च्यांचे दुकान आहे काय? असा सवालही उपस्थित केला.

दहा वर्षात भाजप खासदाराने काय केले?

सांगली लोकसभेसाठी चंद्रहारची उमेदवारी जाहीर करतोय. मातीतला मर्द दिल्लीत पाठवायचा आहे. त्यासाठी सांगलीकरांची साथ हवी. चंद्रहार खासदार झालाच पाहिजे, त्याची जबाबदारी तुम्ही घ्यावी, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. गेली दहा वर्ष निवडून दिले लोकसभेत कधी विमानतळाचा प्रश्न तरी मांडला काय? त्यांनी सिंचन योजना पूर्ण केल्या का, उद्योग आणले काय? असा सवाल करीत भाजपचे खासदार संजयकाका पाटील (Sanjay Patil) यांच्यावर तोफ डागली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सबका साथ मेरे दोस्त का विकास

मुलाबाळांवर बोलता, आम्ही बोलत नाही. मोदींना पहिला पाठिंबा सेनेने दिला. घराणेशाही गद्दारांची पिलावळ चालते कशी. अर्ज भरताना मला बोलावले त्यावेळेस कसं चालत होते. तुमच्या पुत्र प्रेमामुळे देश वर्ल्ड कप हरला. काय संबध त्याचा क्रिकेटशी. गुजरातलाबद्दल द्वेष नाही पण तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात. कोणाशी द्वेष भावनेने वागणार नसल्याचे ठाकरे यांनी जाहीर केले.

गॅरेंटीची बात वॉरंटीचे काय?

केंद्र आणि राज्य सरकार शेतकरीविरोधी आहे. प्रत्येक गॅरंटीची बात केली जाते, मग वारंटीचे काय असा सवाल संपर्क प्रमुख प्रा. नितिन बानुगडे यांनी केला. मेक इन इंडिया, दोन कोटी नोकर्‍या, ड्रायफ्रुट, विमानतळ, कृष्णा स्वच्छतेचे काय झाले. अनेक पक्ष फोडले पण एकाचीच भिती ते म्हणजे उद्धव ठाकरे. गद्दारांच्या पायात बेड्या ठोकणार्‍या जेल फोडून बाहेर पडणार्‍या यशवंतराव वसंतदादा राजारामबापू, पतंगराव कदम यांची भूमी आहे. येथे भगवाच फडकेल.

मोंदींना फक्त ठाकरेंची भीती

खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) म्हणाले, देशात एकच आवाज घुमतोय तो उद्धव व सेनेचाच. मोदींना फक्त उद्धव ठाकरेंची भिती. एकच गॅरंटी चालणार उद्धव ठाकरेंची. वाईट बोलायचं नाही पण सत्ता येईल त्यावेळेस सोडायचे नाही. त्यांच्याकडे डबल, तिब्बल इंजिन आहे, पण आमच्याकडे डबल महाराष्ट्र केसरी. डबल तीबल इंजिन सांगलीत फेल होणार. लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जातो. या मैदानावर चंदहारच लढणार व चंद्रहारच जिंकणार मशाल व गदा घेऊन संसदेत जाणार आहे.

(Edited By : Sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT