Dharashiv District Politics : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शिमगा सुरू झाला आहे. ठाकरे गटाचे माजी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यावर भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी निष्क्रियतेचा आरोप करत, त्यांची उमेदवारी बदलली जाणार असल्याचा दावा केला.
तर विरोधकांना मी पाच वर्षांत केलेला विकास आणि आणलेला हजारो कोटींचा निधी दिसत नाही का? असा पलटवार केला. निवडणुकीच्या तोंडावर सुरू असलेला शिमगा आणि आरोप-प्रत्यारोपाच्या या धुळवडीने सर्वसामान्यांचे मात्र मनोरंजन होत आहे.
भाजपचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य यांनी गुरुवारी एक प्रसिद्धी पत्रक काढून माजी खासदार ओमराजे यांच्यावर निष्क्रियतेची टीका करत गंभीर आरोप केले होते. तसेच महाविकास आघाडी त्यांच्याऐवजी नव्या उमेदवाराच्या शोधात असल्याचा दावा केला होता. त्याला ओमराजे यांनी तुळजापूर तालुक्याती केशेगाव येथील गाव भेटीत प्रत्युत्तर देत पाच वर्षांत केलेल्या कामाचा लेखाजोखाच मांडला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कृष्णा मराठवाडा प्रकल्पासाठी भरीव तरतुद तसेच रेल्वे प्रकल्पासाठीचे भूसंपादन माझ्याच कारकिर्दीत झाले. शेतकऱ्यांसाठी विजेची सुविधा मिळावी यासाठी 1303 कोटी 70 लाखाचा निधी मंजूर केला. रस्ते विकासासाठी सुध्दा हजार कोटी निधी आणलेला आहे. विरोधकांना तो दिसत नाही का? असा थेट सवालच ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केला. जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना मंजूर करुन घेतले. काही महिन्यात तिसरी बॅचही सुरु होईल.
याशिवाय रस्ते विकासाची कामे, मुख्यमंत्री ग्रामसडक, पंतप्रधान सडक योजनेतून करण्यासाठी कोट्यावधींचा निधी मिळाला असल्याचा दावाही ओमराजे यांनी केला. ही सगळी कामे माझ्या प्रयत्नाने झाली असून जनतेला ते माहीत आहे. अडल्यानडल्या जनतेची फोनवरुन होणारी किरकोळात किरकोळ किंवा अगदीच गंभीर कामं झाली असतील, तर विरोधकांच्या पोटात गोळा येण्याच कारण काय? असा सवालही ओमप्रकाश निंबाळकर यांनी केला.
(Edited by- Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.