Uddhav Thackeray Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Uddhav Thackeray News: उद्धव ठाकरे आता ताकही फुंकून पिणार, इंगवलेंच्या राजीनाम्यानंतर कोल्हापूरचा पुढचा 'सेनापती' कोण असणार?

Kolhapur Shivsena News: विधानसभा निवडणुकीनंतर झालेली पडझड आणि कोल्हापूर जिल्ह्यातील ठाकरे यांच्या शिवसेनेतील अंतर्गत वादामुळे पक्षाचे अस्तित्व जिल्ह्यात धोक्यात आले आहे. गेल्या काही वर्षांपासून पक्षाच्या कार्यकर्त्यांना विचारात न घेता घेतलेले निर्णय पक्ष संघटनेला तडा देत आहेत.

Rahul Gadkar

Kolhapur News: विधानसभा निवडणुकीनंतर झालेली पडझड आणि कोल्हापूर जिल्ह्यातील ठाकरे यांच्या शिवसेनेतील अंतर्गत वादामुळे पक्षाचे अस्तित्व जिल्ह्यात धोक्यात आले आहे. गेल्या काही वर्षांपासून पक्षाच्या कार्यकर्त्यांना विचारात न घेता घेतलेले निर्णय पक्ष संघटनेला तडा देत आहेत. त्यामुळे आता पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोल्हापूर जिल्ह्यात ताक ही फुंकून पिणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. रवीकरण इंगवले यांनी जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्या ठिकाणी निवड होणाऱ्या पदाधिकाऱ्याला सर्वांची अनुमती असण्याची भूमिका ठेवली आहे. येत्या शुक्रवारी याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

तीन वर्षांपूर्वी शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर कोल्हापुरातील शिवसेनेवर अधिक परिणाम झाला. दोन खासदार आणि आमदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याने पक्षाची धुरा उपनेते संजय पवार सह संपर्कप्रमुख विजय देवणे यांच्यावर आली. त्यानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणूक झाल्यानंतर पक्षाची अवस्था आणखीन बिकट झाली. मध्यंतरीच्या काळात कोणालाही विश्वासात न घेता जिल्हाप्रमुख म्हणून रविकिरण इंगवले यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

अगोदरच पक्ष संघटन कुमकवत होत असताना जिल्हाप्रमुख रवीकिरण इंगवले यांची निवड केल्याने पक्षातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी ठाकरे यांची शिवसेना सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. त्याचा फटका, नगरपालिका नगरपंचायत, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत बसला. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आलेले अपयश आणि अंतर्गत गटबाजीमुळे झालेली पक्षाची वाताहत पाहता वरिष्ठ पातळीवर त्याची दखल घेतली जाईल, असे सांगितले जात होते.

मात्र, अंतर्गत संघर्षाचे ग्रहण सोडवण्याआधीच वरिष्ठ पातळीवरून केवळ वेळ मारून नेण्याचा प्रयत्न कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनकडून केला जात असल्याची वस्तुस्थिती आहे. जसे कोल्हापुरातील पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये दोन गट आहेत.

तसेच वरिष्ठ पातळीवरील देखील आपल्या मर्जीतील प्रमुख पदाधिकारी यांच्यात देखील दोन गट असल्याचे अनुभव स्थानिक पदाधिकाऱ्यांना आले आहेत. त्यामुळे रस्त्यावरचा निष्ठावंत शिवसैनिक देखील दुखावल्याची स्थिती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत आहे.

राज्यस्तरावर खासदारांची झालेली फोडाफोडी आणि आमदारांना देखील गळाला लावण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा असल्याने ठाकरेंच्या शिवसेनेकडे हातावर मोजण्याइतकेच आमदार आणि खासदार शिल्लक राहतील अशी परिस्थिती आहे. त्यामुळे जिल्हा पातळीवरील पक्ष संघटन आणखीन मजबूत करण्यासाठी आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.

खास करून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच पदाधिकाऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन रिक्त झालेल्या जिल्हाप्रमुख पदावर एका पदाधिकाऱ्यांची निवड केली जाण्याची शक्यता आहे. येत्या शुक्रवारी सर्वच पदाधिकाऱ्यांना मुंबईत बोलवण्याची शक्यता अधिक आहे. त्यानंतरच कोल्हापूर जिल्हाप्रमुख पदाचा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT