Uddhav Thackeray-Bhaskar Jadhav-Shambhuraj Desai Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Bhaskar Jadhav Upset : भास्कर जाधवांच्या नाराजीचे कारण सांगताना शंभूराज देसाईंनी ठाकरेंच्या वर्मावरच घाव घातला!

Shambhuraj Desai Statement : ठाकरेंच्या शिवसेनेत संबंधितांच्या क्षमतेनुसार काम करण्याची संधी कधीच मिळत नाही. मग मनात हळूहळू अशी एक भावना तयार होते की आपली क्षमता असतानासुद्धा आपल्याला पक्षात संधी मिळत नसेल तर माणूस नाराज होतो

Vijaykumar Dudhale

Satara, 16 February : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील माजी मंत्री भास्कर जाधव यांची नाराजी कधीच लपून राहत नाही. ते आपल्या मनातील भावना मोकळेपणाने बोलून दाखवतात. त्यातूनच मला राज्यात काम करण्याची संधी मिळू शकलेली नाही. प्रत्येकी वेळी मला आडवं गेलं, अशी खंत बोलून दाखवली होती. त्यावर शिंदे सेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी भास्कर जाधव यांच्या नाराजीचे कारण सांगताना ठाकरेंवर वर्मी घाव घातला आहे.

शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) म्हणाले, माजी मंत्री भास्कर जाधव यांच्या नाराजीचा विषय हा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. भास्कर जाधव हे विधीमंडळातील सहकारी आहेत. त्यांची काम करण्याची पद्धत गेली 15 वर्षांपासून मी जवळून बघितलेली आहे.

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सर्वच नेत्यांचा भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्याप्रमाणे विषय आहे. ठाकरेंच्या शिवसेनेत संबंधितांच्या क्षमतेनुसार काम करण्याची संधी कधीच मिळत नाही. मग मनात हळूहळू अशी एक भावना तयार होते की आपली क्षमता असतानासुद्धा आपल्याला पक्षात संधी मिळत नसेल तर माणूस नाराज होतोच. त्या नाराजीच्या भावनेतूनच भास्कर जाधव यांनी हे विधान केलं असावं. मुळात हा ठाकरेंच्या शिवसेनेच्या अंतर्गत प्रश्न आहे, त्यामुळे त्यावर जास्त भाष्य करावं, असं मला वाटत नाही, असे देसाई यांनी नमूद केले.

शंभूराज देसाई म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात महायुतीमधील तीनही नेत्यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ज्या ठिकाणी युती करणे शक्य आहे. त्या त्या ठिकाणी महायुती करून लढू. काही ठिकाणी स्थानिक आघाड्या करून लढण्याची परवानगी त्या त्या पक्षांच्या वरिष्ठांकडून देण्यात येणार आहे. महायुतीमधील तीनही पक्षांची हीच भूमिका आहे. त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही महायुती म्हणून लढविण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.

भास्कर जाधव काय म्हणाले होते?

महाराष्ट्रात माझा एक वर्ग आहे, पण मला राज्यात काम करण्याची संधी आतापर्यंत मिळालेली नाही, हे माझं दुर्दैवं आहे. प्रत्येकी वेळी मला आडवं गेलं, असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT