Balasaheb Patil And Shambhuraj Desai: मंत्री शंभूराज देसाई अन् बाळासाहेब पाटील यांच्यात पडणार ठिणगी; काय आहे कारण?

NCP And Shivsena Politics : लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना सह्याद्री कारखान्याच्या कार्यक्षेत्रामधील कऱ्हाड तालुक्यामधील दहा गावांचा समावेश करून घेण्यास सह्याद्री साखर कारखान्याची हरकत असल्याची माहिती आमदार बाळासाहेब पाटील यांनी दिली.
balasaheb Patil - Shambhuraj Desai.jpg
balasaheb Patil - Shambhuraj Desai.jpgSarkarnama
Published on
Updated on

Karad News : साखर कारखान्यांच्या हद्दीतील गावांवर सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार बाळासाहेब पाटील व शिंदे गट शिवसेनेचे नेते व सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्यात ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

बाळासाहेब पाटील यांच्या सह्याद्री साखर कारखान्याच्या हद्दतील दहा गावे लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात घेण्याचा प्रयत्न मंत्री देसाई यांच्याकडून सुरु आहे. याला बाळासाहेब पाटील यांनी विरोध केला आहे.

लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना सह्याद्री कारखान्याच्या कार्यक्षेत्रामधील कऱ्हाड तालुक्यामधील दहा गावांचा समावेश करून घेण्यास सह्याद्री साखर कारखान्याची हरकत असल्याची माहिती आमदार बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पाटील म्हणाले, जॉईंट रजिस्ट्रार को-ऑपरेटिव्ह सोसायटी पुणे यांनी 26 ऑगस्ट 1969 रोजी कारखान्याच्या पोटनियमास मंजुरी दिलेली आहे. त्यानुसार कारखान्याचे कार्यक्षेत्र पाच तालुक्यामधील 191 गावांचा समावेश आहे. त्यापैकी कऱ्हाड तालुक्यामधील सुपने, अबईचीवाडी, पाडळी केसे, तांबवे, म्होत्रे, साकुर्डी, वस्ती साकुर्डी , केसे, साजूर, वसंतगड आदी सह्याद्री साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामधील गावे बेकायदेशीररित्या घेण्याचा विषय लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना, दौलतनगर यांनी त्यांच्या 31 ऑगस्ट 2024 रोजी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेपुढे घेतल्याचे त्यांचा वार्षिक अहवाल पाहिल्यानंतर आमच्या प्रशासनाचे लक्षात आले आहे. यास सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची हरकत आहे.’’

balasaheb Patil - Shambhuraj Desai.jpg
NCP Politics : अजित पवार कुणाची विकेट काढणार; बड्या नेत्याचा मुलगा संपर्कात?

कारखान्याचे संस्थापक (कै.) पी. डी. पाटील यांनी कारखाना उसाच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हावा; भविष्यात कारखान्याच्या गाळप क्षमतेमध्ये होणारी वाढ विचारात घेऊन कारखाना कार्यक्षेत्रामधून बारमाही वाहणाऱ्या कोयना व कृष्णा नद्यावर कारखाना पुरस्कृत मोठ्या १६ जलसिंचन योजना कार्यान्वित केल्या.

कोयना नदीवरील साजुरेश्वर सहकारी पाणीपुरवठा संस्था, साजूर, श्री नाईकबा सहकारी पाणीपुरवठा संस्था बेलदरे, म्होप्रे, भोळेवाडी, भाग्यलक्ष्मी सहकारी पाणीपुरवठा संस्था, आरेवाडी, गमेवाडी, डेळेवाडी, चंद्रसेन सहकारी पाणीपुरवठा संस्था, वसंतगड, अबईचीवाडी, साकुर्डी आणि एकेश्वरी सहकारी पाणीपुरवठा संस्था मर्यादित तांबवे या योजनांद्वारे गावे बागायत करण्यात आलेली आहेत. या गांवामधून सह्याद्री कारखान्यास 1721 सभासद आहेत.

balasaheb Patil - Shambhuraj Desai.jpg
Solapur Bazar Samiti : राजेंद्र राऊतांनी बाजी मारली; दोन देशमुख कधी करून दाखवणार?

या गावांमधून सह्याद्री कारखान्यास 1721 सभासद आहेत. या गावातील क्षेत्र बागायती करण्याबरोबरच ऊस उत्पादकांना मागणीनुसार खते, बी- बियाणे या सारख्या पायाभूत सुविधा देण्याचे काम त्याचबरोबर वेळोवेळी शेतकरी पीक परिसंवाद, चर्चासत्रे व तांत्रिक मार्गदर्शन करण्याचे काम सह्याद्री कारखाना करत असतो, असेही पाटील यांनी सांगितले.

balasaheb Patil - Shambhuraj Desai.jpg
Jagdish Tytler : 1984 च्या शीखविरोधी दंगलप्रकरणी कोर्टाचा मोठा निर्णय; काँग्रेस नेत्याला दणका

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com