Ratnagiri News : कोकणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगर मोहिमेला जोर आला असून आता नेत्यांनी आपला मोर्चा स्थागिक स्वराज्य संस्थांकडे वळवला आहे. जिल्ह्यातील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे महत्वाचे नेते फोडल्यानंतर आता नगरपंचायतीत आपली सत्ता आणण्यासाठी शिंदे गटासह भाजप सक्रीय झाले आहे. मात्र ठाकरे गटाने दोन पावले जाण्यातच धन्यता मानली आहे की काय अशी स्थिती सध्या येथे पाहायला मिळत आहे. येथे
दापोली नगरपंचायतीत काहीच दिवसांपूर्वी ठाकरे गटातच दोन पडल्याचे समोर आले होते. येथे पाच नगरसेवकांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदे सेनेत प्रवेश केला होता. तर या नगरसेवकांनी आपला वेगळा गट निर्माण करत गृहराज्य मंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांची भेट घेतली होती. यावेळीच कदम यांनी आपण नगरपालिकेवर भगवा फडकवू अशी घोषणा केली होती.
यानंतर विषय समित्यांची निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत ठाकरे गट कोणती भूमिका घेणार यावरून तर्कवितर्क लावले जात होते. तर ठाकरे गट मैदान उतरले अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. पण ऐन विषय समित्यांची निवडणुकीत उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या एकाही नगरसेवकाने अर्ज भरला नाही. उलट सर्वच नगरसेवकांनी नगरपालिकेकडे पाठ केली. यामुळे आता विषय समित्यांवर महायुतीचे वर्चस्व निर्माण झाले आहे. यामुळे आता दापोली नगरपंचायतीत लवकरच सत्ताबदल होईल असा दावा शिवसेनेकडून केला जातोय. 2024 मधील विषय समितींच्या निवडणुकीतही ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक अनुपस्थित राहिलेले होते.
दापोली नगरपंचायतीत 17 नगरसेवक असून उबाठा शिवसेनेकडे 8, शिंदे शिवसेनेकडे 5 आणि 2 अपक्ष असे 7, राष्ट्रवादी 1, भाजप 1 असे पक्षीय बलाबल आहे. नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष हे उबाठा गटाचे असल्यामुळे त्यांना 2 समित्या मिळणार होत्या. संख्याबळानुसार आणखी दोन समित्या या उबाठाकडे आल्या असत्या. मात्र काल झालेल्या अंतर्गत घडामोडींमुळे निवडणुकीवेळी उबाठा गटाचा एकही नगरसेवक नगरपंचायतीत फिरकला नाही.
दापोली तहसिलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना बोंबे व सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी विषय समित्यांच्या निवडी बिनविरोध झाल्याचे जाहीर केले. नगराध्यक्ष ममता मोरे, उपनगराध्यक्ष खालीद रखांगे, स्वच्छता सभापती जया साळवी, पाणीपुरवठा सभापती प्रिती शिर्के, महिला व बालकल्याण समिती सभापती अश्विनी लांजेकर यांचा समावेश आहे.
एकीकडे विषय समिती निवडीनंतर शिवसेना व भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. तर ऐन लढाईच्या वेळी ठाकरे गटाने तलवार म्यान केल्याची टीका आता शहरात केली जातेय. तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेना शहरप्रमुख प्रसाद तथा पप्पू रेळेकर यांनी, दापोली शहराचा विकास राज्यमंत्री योगेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली केला जाईल. लवकरच नगरपंचायीवर आमची सत्ता असेल, आमचा भगवा फडकेलं असा दावा केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.