Shivsena UBT : "ठाकरेंच्या शिवसेनेत संवाद नाही, केवळ चाटूकारांची फौज..."; प्रवक्ते पदावरून हकालपट्टी केलेल्या तिवारींचा राऊतांसह ठाकरेंवर हल्लाबोल

Kishor Tiwari On Sanjay Raut : ठाकरेंच्या शिवसेनेतून प्रवक्ते पदावरून नुकतंच हकालपट्टी केलेल्या किशोर तिवारी यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत पक्ष प्रमुखांच्या निर्णयावर आणि भूमिकेवर देखील टीका केली आहे.
Kishor Tiwari On Sanjay Raut, Uddhav Thackeray
Kishor Tiwari On Sanjay Raut, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Nagpur News, 22 Feb : ठाकरेंच्या शिवसेनेतून (Shivsena UBT) प्रवक्ते पदावरून नुकतंच हकालपट्टी केलेल्या किशोर तिवारी यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत पक्ष प्रमुखांच्या निर्णयावर आणि भूमिकेवर देखील टीका केली आहे.

तसंच प्रवक्ता असतानाही मला हिंदुत्वाची भूमिका घेण्यापासून रोखल्याचा आरोप तिवारी यांनी केला आहे. एका मुलाखतीत बोलताना त्यांनी हे आरोप केले आहेत. किशोर तिवारी (Kishore Tiwari) म्हणाले, संजय राऊत हे पक्षाचे विचार मांडत नाहीत तर ते फक्त स्वतःचे विचार मांडतात. त्यांच्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेची विश्वसनीयता खालवली आहे.

Kishor Tiwari On Sanjay Raut, Uddhav Thackeray
Ravindra Dhangekar : पुण्यात राजकीय उलथापालथ? रवींद्र धंगेकरांच्या 'त्या' सूचक 'व्हाट्सअप स्टेटस'मुळे चर्चांना उधाण

मी प्रवक्ता असताना निवडणुकीच्या काळात हिंदुत्वाची भूमिका मला घेऊ दिली नाही. कारण वरुण सरदेसाई आणि आदित्य ठाकरेंच्या (Aaditya Thacketray) विजयासाठी मुस्लिमांचं मतदान गरजेचं होतं, असा आरोप तिवारी यांनी केला.

स्वबळाची भूमिका घेतल्यामुळेच पक्षाला गळती

तर स्वबळाची भूमिका घेतल्यामुळेच पक्षाला गळती लागल्याचाही दावा त्यांनी यावेळी केला. ते म्हणाले, नागपुरात येऊन राऊतांनी (Sanjay Raut) स्वबळाचा नारा दिला आणि पक्षाला गळती लागली. आदित्य ठाकरे यांचे विश्वासू दुष्यंत चतुर्वेदी यांनी राऊतांच्या स्वबळाच्या भूमिकेमुळेच पक्ष सोडला. तर राजन साळवी सोडून गेले तरी पक्षात कोणाला जाग आलेली नाही.

ज्याला जायचं आहे त्यांनी जा, कोणाच्या जाण्याने काही फरक पडत नाही, ही पक्षाची भूमिका आत्मघाती असल्याचंही तिवारी म्हणाले. दरम्यान, यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) आपल्याला भेटीसाठी कधीच वेळ दिला नसल्याचा गंभीर आरोप देखील केला. ते म्हणाले, "ठाकरेंना भेटण्यासाठी पैसे खर्च करून जवळपास दहा वेळा मुंबईला आलो.

Kishor Tiwari On Sanjay Raut, Uddhav Thackeray
Manikrao Kokate : मोठी बातमी! माणिकराव कोकाटेंची आमदारकी, मंत्रिपद धोक्यात? विधानसभा अध्यक्षांनी सांगितले कारवाई कधी करणार

मात्र, कधीच त्यांच्याशी भेट झाली नाहीच उलट मला हाकलून लावलं. ठाकरेंनी कधीच संवाद साधला नाही. ते केवळ एकदा भेटले आणि तुमच्याशी शांतपणे भेटायचं आहे, असं म्हणाले. ती ती वेळ आतापर्यंत आलीच नाही." तसंच यावेळी रवी राणा यांच्या विरोधात चुकीचा उमेदवारा दिल्याचा दावा देखील त्यांनी केला. ते म्हणाले. राणांच्या विरोधात प्रीती बंड यांच्या सारखा दमदार उमेदवार असताना चुकीचा उमेदवार दिला.

लबाड आणि चाटूकारांची फौज गोळा करून ठाकरे पक्षाची पुन्हा उभारणी करण्याचा प्रयत्न करत असतील आणि पक्षाच्या चुका लक्षात आणून दिल्या म्हणून आम्हाला पदमुक्त केलं जात असेल तर आम्ही काय करावं? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. शिवाय ठाकरे गटामध्ये समन्वय आणि संवाद नावाची कुठली गोष्ट नाही. पक्षाकडे कोणताही कार्यक्रम नाही, दिशा नाही. पक्षाला दिशा असती तर लोकांनी पक्ष सोडला नसता, असा हल्लाबोल देखील त्यांनी यावेळी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com