Phaltan Raje Groups Activist sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Phaltan APMC Result : राजेगटाचे निर्विवाद वर्चस्व; शिवसेना, रासप, काँग्रेसचा धुव्वा

Ramraje Naik Nimbalkar विविध पक्षीयांनी एकत्र येत राजे गटापुढे आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतू बलाढ्य राजे गटापुढे हे आव्हान तोकडे पडले.

Umesh Bambare-Patil

-किरण बोळे

Phaltan APMC Result : फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत पुन्हा एकदा राजेगटाने Ramraje Nimbalkar Group आपले निर्विवाद वर्चस्व सिध्द केले. सर्व चौदा जागांवर मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला आहे. यापुर्वी राजेगटाचे चार उमेदवार बिनविरोध झाले हाोते. विविध पक्षीयांनी एकत्र येत राजे गटापुढे आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतू बलाढ्य राजे गटापुढे हे आव्हान तोकडे पडल्याचे निकालावरुन स्पष्ट झाले आहे.

फलटण बाजार समितीच्या निवडणूकीत विजयी झालेले उमेदवार व त्यांना पडलेली मते व प्रवर्ग पुढील प्रमाणे : कृषि पत व बहुद्देशीय सेवा सहकारी संस्था मतदार संघ ( सर्वसाधारण ) - रघुनाथराजे नाईक निंबाळकर (१२२३), ज्ञानदेव बाबासो गावडे (१२४१), शरद लक्ष्मण लोखंडे (१२३८), चेतन सुभाषराव शिंदे (१२३३), दीपक विठोबा गौंड (१२२५), शंभुराज विनायक पाटील (११९८), भगवान दादासो होळकर (११९६)

महिला प्रतिनिधी - सुनीता चंद्रकांत रणवरे (१२५१), जयश्री गणपत सस्ते (१२२५). विमुक्त जाती भटक्या जमाती - भिमराव पोपटराव खताळ (११६०). ग्रामपंचायत मतदार संघ - (सर्वसाधारण) किरण सयाजी शिंदे (८१७), चांगदेव कृष्णा खरात (८१५), व्यापारी अडते मतदार संघ - संजय हरिभाऊ कदम (६८), समर दिलीप जाधव (६१).

दरम्यान यापुर्वी तुळशीराम दशरथ शिंदे (कृषि पत व बहुद्देशीय सेवा सहकारी संस्था), अक्षय शामराव गायकवाड (अनुसुचित जाती/जमाती), संतोष मल्हारी जगताप (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक), निलेश सुरेश कापसे (हमाल, मापाडी ) हे बिनविरोध यापुर्वीच निवडून आले आहेत.

या निवडणूकीत शिवसेना shivsena, रासप RSP, राष्ट्रीय काँग्रेस Congress यांनी एकत्र येत सत्तारुढ राजे गटापुढे आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतू त्यांच्या सर्व उमेदवारांना पराभवाचे तोंड पहावे लागले. राजे गटाने सर्व अठरा जागा जिंकुन विरोधकांना व्हाईट वॉश दिला. निवडणूक निकालानंतर राजे गटाच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत जल्लोषात विजय साजरा केला.

सर्व विजयी उमेदवारांचे आमदार रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी जिल्हा परिषद सदस्या शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, पंचायत समितीचे माजी सभापती शिवरुपराजे खर्डेकर, विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांच्यासह अन्य मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT