Vairag Nagar panchayat Election sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या डोळसे वैरागच्या पहिल्या नगराध्यक्ष; निरंजन भूमकर उपनगराध्यक्ष!

वैराग नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या सुजाता डोळसे यांची बिनविरोध निवड

सरकारनामा ब्यूरो

वैराग (जि. सोलापूर) : वैराग नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (ncp) सुजाता डोळसे तर उपनगराध्यक्षपदी निरंजन भूमकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. वैरागच्या पहिल्या नगराध्यक्ष बनण्याचा मान सुजाता डोळसे यांना मिळाला आहे. (Unopposed election of NCP's Sujata Dolse chairman of Vairag Nagar Panchayat)

वैराग नगर पंचायतीच्या कार्यालयात नूतन नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदासाठीची निवड प्रक्रिया शुक्रवारी (ता. १८ फेब्रुवारी) दुपारी राबविण्यात आली. वैराग नगर पंचायत निर्मितीनंतर पहिल्यांदाच झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या निरंजन भूमकर यांच्या नेतृत्वाखाली 17 पैकी 13 जागा जिंकून नगरपंचायतीवर वर्चस्व मिळविले होते. नगराध्यक्षपदासाठी अनुसूचित जातीचे आरक्षण निघाल्याने सुजाता संगमेश्वर डोळसे यांची नगराध्यक्षपदी निवड झाली. उपनगराध्यक्ष पदासाठी एकच अर्ज आल्याने राष्ट्रवादीचे नेते निरंजन भूमकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदासाठी प्रत्येकी एक अर्ज आल्याने दोन्ही निवडी बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी अरुणा गायकवाड यांनी जाहीर केले.

या वेळी अतुल मोहिते, तृप्ती भूमकर, अनुप्रिया घोटकर, गुरुबाई झाडबुके, आसमा मिर्झा, पद्मिनी सुरवसे, जैतुनबी बागवान, नागनाथ वाघ, अक्षय ताटे, अजय काळोखे, जयश्री घोडके, तसेच शाहुराजे निंबाळकर, राणी आदमाने, अर्चना रेड्डी, श्रीशैल्य भालशंकर या नूतन नगरसेवकांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी वीणा पवार, नगर अभियंता रामभाऊ जाधव, अमोल भूमकर, भूषण भूमकर, खंडेराया घोडके, महादेव ढोले, बालाजी देवकर, चंद्रकांत पांढरमिसे आदी उपस्थित होते.

दरम्यान, वैरागच्या जनतेने टाकलेल्या विश्वासाला तडा जावू देणार नाही. महाविकास आघाडीच्या सहकार्याने स्वच्छ, सुंदर वैराग करण्याचा प्रयत्न करू, असे आश्‍वासन नूतन उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर यांनी दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT