मोहिते पाटील गटाचा नगराध्यक्ष झाला; पण राष्ट्रवादीनेच गुलाल उधळला...

श्रीपूर-महाळूंग नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी लक्ष्मी चव्हाण, तर उपनगराध्यक्षपदी भीमराव रेडे पाटील यांची बिनविरोध निवड
Sripur-Mahalung Nagar Panchayat election
Sripur-Mahalung Nagar Panchayat electionsarkarnama

श्रीपूर (जि. सोलापूर ) : माळशिरसपाठोपाठ श्रीपूर-महाळूंग नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोहिते-पाटील (mohite patil) गटाच्या रेडे-पाटील आणि मुंडफणे गटात फाटाफूट झाली. या दोन्ही गटांनी सत्तेसाठी आघाडीचीही स्थापना केली होती. मात्र, अवघी पाच सदस्यसंख्या असलेल्या रेडे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला (ncp) सोबत घेतले आणि नगराध्यक्षपदासोबतच उपनगराध्यक्षपदी पदरात पाडून घेतले. पण, सर्वाधिक सहा जागा जिंकणाऱ्या राष्ट्रवादीच्या हाती काय लागले, हे मात्र गुलदस्त्यातच आहे. (Lakshmi Chavan elected as chairman of Sripur-Mahalung Nagar Panchayat)

दरम्यान, महाळूंग-श्रीपूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी रेडे पाटील गटाच्या लक्ष्मी अशोक चव्हाण यांची, तर उपनगराध्यक्षपदी भीमराव रेडे-पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. सतरा सदस्य असलेल्या श्रीपूर-महाळुंग नगरपंचायत निवडणुकीत सर्वाधिक सहा जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसने जिंकल्या आहेत. भीमराव रेडे पाटील गटाने पाच, तर नानासाहेब मुंडफणे गटाने चार जागा जिंकल्या आहेत. या दोन्हा गटांनी सत्तास्थापनेच्या निमित्ताने नऊ सदस्यांची सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील विकास आघाडी स्थापना केली होती. या आघाडीच्या वतीने नगराध्यक्षपदासाठी श्रीमती चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज भरला होता. त्यावर अनुमोदक सूचक म्हणून रेडे-पाटील व मुंडफणे यांच्या सह्या आहेत.

Sripur-Mahalung Nagar Panchayat election
मोहिते-पाटलांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला सत्तेची लॉटरी!

नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने भरलेला नामदेव इंगळे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसबाबत साशंकता निर्माण झाली होती. राष्ट्रवादीने आपला उमेदवार मागे घेतल्यानंतर चव्हाण यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आणि त्यानंतर उपनगराध्यक्षपदासाठी वेगाने हालचाली झाल्या. विकास आघाडीच्या वतीने नगराध्यक्षपद रेडे पाटील गटाला मिळाल्यामुळे उपनगराध्यक्षपद आपल्याच गटाला मिळेल, अशी अपेक्षा मुंडफणे यांना होती. मात्र, रेडे-पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर समझोता केला आणि उपनगराध्यक्षपदासाठी स्वतःचीच उमेदवारी पुढे केली. त्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही पाठिंब्याची तयारी दर्शविली. नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदासाठी चव्हाण व रेडे पाटील यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे या निवडी बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केले.

Sripur-Mahalung Nagar Panchayat election
अजितदादांच्या नादाला लागल्यानंतर काय होते, हे इंदापूर, पुरंदरने पाहिलंय!

बिनविरोध निवडीनंतर रेडे-पाटील, श्रीमती चव्हाण यांच्या समर्थकांनी राष्ट्रावादी कॉंग्रेसचे नेते व सदस्यांसह विजयाचा गुलाल उधळला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राहूल रेडे पाटील व विकास आघाडीचे भीमराव रेडे पाटील यांची यमाईदेवी मंदिर परिसरात विजयी मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी विकास आघाडी, राष्ट्रवादी कॉंग्रेस व रिपब्लिकन पक्षाचे समर्थक कार्यकर्ते उपस्थित होते.

Sripur-Mahalung Nagar Panchayat election
लाकडी-निंबोडी योजनेच्या फाईलवर मुख्यमंत्र्यांची सही; पवारांच्या हस्ते लवकरच भूमिपूजन!

अन्‌ मुंडफणे गटाने निवडीकडे पाठ फिरवली

विकास आघाडीचे आपण घटक आहोत. नगराध्यक्षपद एका गटाला दिले आहे, त्यामुळे उपनगराध्यक्ष पद आपल्यालाच मिळेल. हा आशावाद मुंडफणे गटाला होता. मात्र, नगराध्यक्षपद बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाल्यावर उपनगराध्यक्षपदासाठी आपल्याला डावलले जात आहे. हे लक्षात आल्यावर मुंडफणे गटाच्या नगरसेवकांनी पदाधिकारी निवडीकडे पाठ फिरवली. नानासाहेब मुंडफणे, सोमनाथ मुंडफणे, तानाजी भगत व नजिया पठाण हे पदाधिकारी निवडीच्यावेळी गैरहजर राहिले तर, कॉंग्रेसच्या कल्पना काटे या उपनराध्यक्षपदाच्या प्रक्रियेच्यावेळी गैरहजर होत्या.

Sripur-Mahalung Nagar Panchayat election
राजू शेट्टींनी थोपटले दंड; एकरकमी एफआरपी चे आंदोलन पेटले

मुंडफणे गटाची महिनाभराची धावपळ वाया

चार सदस्य निवडून आलेल्या मंडफणे गटाला विकास आघाडीत सामावून घेतले. त्यानंतर नगराध्यक्ष पदाच्या निवडीच्या प्रक्रियेत त्यांना सामावून घेतले. नगराध्यक्षपदाची निवडून बिनविरोध होते, हे लक्षात आल्यावर रेडे पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसशी सलगी वाढविली आणि केवळ पाच सदस्यांचे संख्याबळ असताना नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपद आपल्याकडे ठेवण्यात ते यशस्वी झाले. आपल्या सावध व सतर्क राजकारणाची चूणूक त्यांनी यानिमित्ताने दाखवून दिली. त्यामुळे पदाधिकारी निवडीच्या निमित्ताने गेले महिनाभर धावपळ करणाऱ्या मुंडफणे गटाच्या पदरी घोर निराशा आली असून, रेडे पाटलांनी मुंडफणे यांना कात्रजचा घाट दाखविल्याचे स्पष्ट झाले आहे.

राष्ट्रवादीच्या पदरात नेमके काय पडले

नगराध्यक्षपदासाठी भरलेला अर्ज राष्ट्रवादी कॉंग्रेसने माघारी घेतला. उपनगराध्यक्षपदासाठी रेडे पाटील यांना पाठिंबा दिला. या दोन्ही पदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने रेडे पाटील यांना साथ दिली आहे. राष्ट्रवादीचे सदस्य विजयाच्या गुलालात न्हाऊन निघाले आहेत. सहा सदस्य असणाऱ्या राष्ट्रवादीने पाच सदस्य असलेल्या रेडे पाटील यांना दोन्ही पद बहाल केली आहेत. दोन्ही पदे आपल्याच गटाकडे घेऊन नगरपंचायतीवर एकहाती सत्ता आणण्यात रेडे पाटील यशस्वी झाले आहेत. पण, राष्ट्रवादीच्या पदरात नेमके काय पडले आहे, याचा शोध घ्यावा लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com