Akkalkot News : Solapur politics Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Akkalkot News : स्वामी समर्थ साखर कारखाना; चेअरमनपदी संजीव पाटलांची बिनविरोध निवड !

Solapur Politics : व्हाईस चेअरमनपदावर हन्नूर गावचे विश्वनाथ भरमशेट्टी यांची बिनविरोध नियु्क्ति

चेतन जाधव

Solapur Sugar Factory Politics : सोलापूर जिल्ह्यातील, अक्कलकोटमधील दहीटणेच्या स्वामी समर्थ सहकारी साखर कारखाना चेअरमनपदावर संजीव सिद्रामप्पा पाटील (Sanjeev Patil) यांची तर व्हाईस चेअरमनपदावर हन्नूर गावचे विश्वनाथ भरमशेट्टी यांची बिनविरोध नियु्क्ति करण्यात आली. याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी किरण गायकवाड यांनी केले. तर या निवड प्रक्रियेचे काम सहाय्यक म्हणून विद्याधर माने यांनी काम पाहिले. (Swami Samarth Sugar Factory News)

दि. ८ रोजी सोमवारी ४ वाजता या निवडीसाठी सर्वसाधरण सभेचे ४ वाजता या कारखान्याच्या कार्यक्रमस्थळावर निवडीसाठी सर्वसाधरण सभा बोलवण्यात आली होती. चेअरमन व व्हाईस चेअरमन दोन्ही पदासाठी एकच उमेदवार अर्ज दाखल झाल्यामुळे दोन्ही पदाची बिनविरोध निवड करण्यात आली. (Latest Marathi news)

यावेळी जेष्ठ नेते व माजी आमदार तथा साखर कारखान्याचे मावळते चेअरमन सिद्रामप्पा पाटील यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देताना कारखाना चालू करण्यासाठी नव्या पदाधिकारींसमोर आव्हान असून, ते पेलण्यासाठी सर्वांनी एकत्रित मिळून मिसळून काम करण्याचे आवाहन केलं. नवे चेअरमन संजीवकुमार पाटील यांनीही आपण सर्वांनी दिलेला विश्वास सार्थ ठरवू, कारखान्याची विकासाकडे वाटचाल करण्यासाठी सर्व संचालकांना एकत्रित घेऊन काम करू, अशी ग्वाही त्यांनी याप्रसंगी बोलताना दिली.

या निवडीप्रसंगी साखर कारखान्याचे माजी चेअरमन व माजी आमदार संचालक सिद्रामप्पा पाटील, बसलिंगप्पा खेडगी, दिलीप पाटील, आप्पासाहेब पाटील,युवा नेते आदर्श पाटील,आनंद पाटील, आकाश पाटील उत्तम वाघमोडे, श्रीमंत कुंटोजी, भीमाशंकर धोत्री, संजीवकुमार अ. पाटील, महेश पाटील, दिलीप शावरी, गिरीजा विजापुरे, देवेंद्र बिराजदार, अभिजित सवळी, शिवप्पा बसरगी, महानंदा निंबाळ, मल्लिकार्जुन बिराजदार, भरमनाथ भुताळी, कार्यकारी संचालक अशोक मुलगे आदीजण उपस्थित होते.

निवड जाहिर होताच नूतन चेअरमन व्हाईस चेअरमन व नूतन संचालकांचा सत्कार करण्यात आला. सत्कार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मल्लिनाथ दुलंगे, अशोक वर्दे यांनी तर आभार बाके व मल्लिनाथ भासगी यांनी मानले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT