- शांताराम पाटील
Urun Ishwarpur Election Result : पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चेची ठरलेली आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची ठरलेल्या उरूण ईश्वरपूर नगरपालिका निवडणुकीचा निकाल आता समोर आला आहे.
या निवडणुकीत जयंत पाटलांनी आपलं निर्विवाद वर्चस्व सिद्ध करत भाजपसह महायुतीतील मित्रपक्षांचा धूळ चारली आहे. जयंत पाटील यांचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदराव मालगुंडे तब्बल साडेसात हजार मतांनी विजयी झाले.
तर नगरसेवकांच्या ३० पैकी २३ जागा मिळवत जयंत पाटलांनी आपला बालेकिल्ला पुन्हा एकदा ताब्यात घेतला आहे. जयंत पाटलांच्या विरोधात एकवटलेल्या भारतीय जनता पक्षासह शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आघाडीला केवळ ८ जागा मिळाल्या आहेत.
इस्लामपूर नगरपरिषदेच्या मागील निवडणुकीत जयंत पाटलांचा दबदबा असलेली पालिकेची सत्ता विकास आघाडीने आपल्या ताब्यात घेतली होती. मात्र, यंदाच्या निवडणुकीत उरूण ईश्वरपूपच्या मतदारांनी या आघाडीला नाकारत जयंत पाटलांना साथ दिली.
सर्वात महत्वाचं म्हणजे यंदाची निवडणूक विरोधकांनी अतिशय प्रतिष्ठेची केली होती. महायुतीच्या प्रचारासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतली होती. तर उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे दोन दिवस ईश्वरपुरमध्ये तळ ठोकून होते.
राज्यमंत्री योगेश कदम, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी प्रचारात उडी घेतली होती. मात्र, तरीही महायुतीच्या पदरात मोठं अपयश आलं आहे. तर दुसरीकडे गेलेली सत्ता परत मिळवत जयंत पाटलांनी आपली ताकद पुन्हा दाखवून दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.