Dr. Sujay Vikhe Patil
Dr. Sujay Vikhe Patil Paresh Kapse
पश्चिम महाराष्ट्र

टक्केवारी मिळवण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सत्तेचा वापर...

सरकारनामा ब्युरो

अहमदनगर - केंद्र सरकारच्या राष्ट्रीय वयोश्री योजनेतून सर्वाधिक कामे सध्या अहमदनगर जिल्ह्यात सुरू आहेत. या राष्ट्रीय वयोश्री योजना शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( Dr. Sujay Vikhe Patil ) यांनी घुले कुटुंबिय व महाविकास आघाडीवर टीकेची तोफ डागली. ( Use of power by the leaders of Mahavikas Aghadi to get percentage ... )

शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील लाभार्थ्यांना राष्ट्रीय वयोश्री योजनेचे मोफत साहित्य साधने वितरण प्रसंगी खासदार डॉ सुजय विखे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार मोनिका राजळे ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, उपाध्यक्ष गोकुळ दौंड, पाथर्डी तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, शेवगाव भाजप तालुकाध्यक्ष ताराचंद लोंढे, जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, डॉ. मृत्यूंजय गर्जे, नंदकुमार शेळके, विष्णूपंत अकोलकर आदी उपस्थित होते.

खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, राजकारण करत असतांना लोकांच्या कामांसाठी स्वतःच्या खर्चातून आम्ही कामे करतो. परंतु लोकांना त्रास होऊ नये याची काळजी घेतो. राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून लोकांसाठी महाविकास आघाडी सरकारने स्वतःच्या खिशातून एक रुपयाही खर्च कधी केला नाही. गरिबांच्या कल्याणकारी योजना सुद्धा त्यांना राबवता आली नाहीत. जिल्हा परिषदेमध्ये टक्केवारी शिवाय कामे मंजूर होत नाहीत. टक्केवारी मिळवण्यासाठी सत्तेचा वापर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून होत आहे. गोर गरिबांच्या कामासाठी सत्तेचा वापर आपण करतो कोणाच्या ताटातील अन्न खाण्यासाठी राजकारण करत नाही, असा टोलाही खासदार डॉ सुजय विखे यांनी लगावला.

खासदार विखे पुढे म्हणाले, की आमच्याकडून वेळप्रसंगी लोकांच्या कामांसाठी स्वतःच्या खर्चातून कामे मार्गी लावले जातात. मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांची विकासकामातील टक्केवारीची रक्कम दिवसंदिवस वाढत आहे. मग शेवगाव -पाथर्डी तालुक्यात काय विकास होणार, असे म्हणत त्यांनी घुले कुटुंबावर नाव न घेता टीका केली.

एका ठिकाणी सत्ता देऊन त्यांचे परिणाम काय होतात त्यांचे जिल्हा परिषेदेत अनुभवायला येत आहे. गरिबांची मुले शिकतात अश्या जिल्हा परिषद शाळेच्या खोल्यांच्या बांधकामात सुद्धा टक्केवारी घेण्यात येते. ही टक्केवारीची प्रथा आणि संस्कृती पहिले कधीच जिल्हात नव्हती. आम्हाला सत्ता हवी आहे ती फक्त लोकांच्या प्रामाणिक कामासाठी. अनेक लोक माझ्यावर आरोप करून शिंतोडे उडवतात मला याचा काही फरक पडत नाही. मी प्रामाणिक काम करतो. कोणाच्या ताटातील घेत नाही. त्यामुळे मला कोणाची भीती नाही, असे खासदार डॉ. विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

आमदार मोनिका राजळे म्हणाल्या, खासदार सुजय विखे यांनी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय वयोश्री योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबविली. योजनेमुळे वयोवृद्ध अपंगांना आधार मिळाला आहे. खासदार विखे यांच्या या कामाचे कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे. विखेंच्या कामामुळे शेवगाव-पाथर्डीच्या जनतेला केंद्राच्या योजनेचा लाभ मिळत आहे. भविष्यातही या योजनेत वंचितांना न्याय मिळवून देण्याचे काम विखेंनी करावे. विखेंच्या खासदारकीच्या कामामुळे जनतेला आधार वाटत आहे, असे आमदार राजळे यांनी सांगितले.

युक्रेनमधून परतणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मिशन गंगाच्या माध्यमातून युक्रेन येथून सुरक्षित आगमन झाल्या बद्दल शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील रुपेश घोडके, पूजा बोरूढे यांचा खासदार डॉ सुजय विखे पाटील व आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT