Uttam Jankar attacked Ajit Pawar  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Uttam Jankar: म्हातारपणात गुलाबी साडी नेसणं चुकीचं! उत्तम जानकरांनी अजितदादांच्या 'वर्मा'वरचं बोट ठेवलं

Malshiras Assembly Constituency election 2024 Ram Satpute vs Uttam Jankar: अजितदादा वाघ होते, भाजपनं त्यांची नख काढून घेतली आहेत. अजितदादा वाघाची शेळी झाली आहे," अशा शब्दांत उत्तम जानकर यांनी अजित पवार यांनी डिवचलं.

Mangesh Mahale

Pandharpur News: माळशिरस विधानसभा मतदारसंघात सध्या चांगलीच रंगत निर्माण झाली आहे. मतदासंघात एकूण 12 उमेदवार रिंगणात उभे असले तरी खरी लढत ही विद्यमान आमदार राम सातपुते व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार उत्तम जानकर (Uttam jankar) यांच्यात होत आहे. उत्तम जानकरांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

विधानसभा निवडणूक प्रचारात अजित पवार सध्या गुलाबी जॅकेट परिधान करुन सभा गाजवत आहेत, त्यांच्या या गुलाबी जॅकेटची उत्तम जानकरांनी खिल्ली उडवली आहे. "म्हातारपणात गुलाबी साडी नेसणे म्हणजे चुकीचे आहे. तरुण पणातच साडी नेसायला पाहिजे होती.आता काय उपयोग," असा टोलाही जानकर यांनी लगावला.

अजित पवार हे फितूर निघाले...

"अजित पवार हे फितूर निघाले. सध्या ते देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी राबत आहेत. अजितदादा यांच्यात धैर्य नाही , तपश्चर्या नाही. अजितदादा वाघ होते, भाजपनं त्यांची नख काढून घेतली आहेत. अजितदादा वाघाची शेळी झाली आहे," अशा शब्दांत उत्तम जानकर यांनी अजित पवार यांनी डिवचलं.

दादांचे फक्त पाच-सहा आमदार निवडून येतील...

राज्यात महाविकास आघाडीला 200 पेक्षा अधिक जागा मिळतील तर अजि दादांचे फक्त पाच-सहा आमदार निवडून येतील. एकनाथ शिंदे यांचे १०-१२ आमदार निवडून येतील, तर भाजपचे 40 -50 आमदार निवडून येतील, असा दावा ही जानकर यांनी केला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील महत्वाचा आणि माजी पालकमंत्र्यांचा मतदारसंघ राहिलेल्या माळशिरस मतदारसंघात यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडीमध्ये जोरदार लढत होत आहे.गेल्या निवडणुकीत (2019) या मतदारसंघातून भाजपचे राम सातपुते विजयी झाले होते, त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या उत्तम जानकर यांनी टफ फाईट दिली होती. यंदाही येथील मतदारसंघात अशीच लढत होत आहे.

राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या फुटीनंतर येथील राजकीय स्थित्यंतर व गणितं बदलली आहे. त्यामुळे, यंदा माळशिरस विधानसभा (vidhansabha) निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाल्याचे दिसते.

माळशिरस विधानसभा मतदारसंघात एकूण 3लाख 38हजार मतदार आहेत.त्यापैकी सर्वात जास्त म्हणजे जवळपास 2 लाख 20हजार मतदार हे मराठा समाजाचे आहेत.तर अनुसूचित समाजाचे 60हजार मतदार आहेत. याशिवाय धनगर समाजाचे मतदार देखील बहुसंख्येने आहेत.

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी निवडणूक लढविणार नसल्याचे सांगितल्यामुळे तालुक्यातील मराठा समाज नेमके कोणाच्या पाठीमागे उभा राहणार. हा प्रश्न देखील अनुतरीत आहे. अनुसूचित समाज कोणाला मतदान करणार. यावर बरेचसे गणित अवलंबून आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT