Supriya Sule: ...तर अजितदादांना नोटीस पाठवणार ; सुप्रिया सुळे यांचा इशारा

Ahilyanagar city assembly constituency election: 'देवाभाऊ' या नावावरुन सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोमणा मारला. एकेकाळी देवाभाऊ या नावाबाबत मला खूप आधार होता, हे नाव मला खूप आवडते, विरोधक असावा पण तो दिलदार असावा, असे वाटत होते. पण 'देवाभाऊ'आता खराब संगत लागली आहे.
Supriya Sule Vs Ajit Pawar
Supriya Sule Vs Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar News: "राष्ट्रवादी काँग्रेस हा अजित पवार याचा पक्ष नाही, घड्याळ चिन्ह देखील त्यांचे नाही. जर पक्षाच्या चिन्ह्याखाली 'न्यायप्रविष्ट' असे लिहिले नसेल तर तुम्ही मला त्याचे फोटो पाठवा, मी त्यांना कोर्टाकडून नोटीस पाठवते," असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला आहे. त्या अहिल्यानगर येथील सभेत बोलत होत्या.

आमची लढाई ही कुठल्याही व्यक्तीविरोधात नाही, तर पक्षाच्या विरोधात आहे. कोर्टात केस सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा अजित पवार याचा पक्ष नाही, चिन्ह देखील त्यांचे नाही, असे कोर्टाने स्पष्ट सांगितले आहे.

अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार अभिषेक कळमकर यांच्या प्रचारासाठी घेण्यात आलेल्या सभेत खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुतीमधील नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर तोफ डागली. त्या म्हणाल्या, "देवाभाऊ हे नाव मला खूप आवडते. पण त्याला संगत खराब लागली. आजच्या भाजपपेक्षा आधीची भाजप चांगली होती",

Supriya Sule Vs Ajit Pawar
Raj Thackeray: महाराष्ट्र माझ्या जिव्हाळ्याचा प्रश्न, खुर्चीचा नाही; थट्टेचा विषय होता कामा नये!

सुप्रिया सुळे यांनी माजी गृहमंत्री दिवगंत आर. आर. पाटील आणि सध्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाची तुलना करीत फडणवीसांना खडेबोल सुनावले. आर. आर. पाटील गृहमंत्री असताना त्यांनी एक लाख पोलिस भरती केली. परंतु आजचा गृहमंत्री बदलापूर घटनेनंतर बंदूक दाखवतो. यातून देवाभाऊ संगतीने बिघडला हे स्पष्ट होते, असा टोमणा सुळे यांनी फडणवीस यांच्यासह अजित पवार यांना लगावला.

Supriya Sule Vs Ajit Pawar
Sharad Pawar : शरद पवारांच्या बहिणीचा पक्का निश्चय! मला मुश्रीफांना पाडायचंय; भाऊ राज्यभर फिरत असताना मी घरी कशी बसू?

'देवाभाऊ' या नावावरुन सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोमणा मारला. एकेकाळी देवाभाऊ या नावाबाबत मला खूप आधार होता, हे नाव मला खूप आवडते, विरोधक असावा पण तो दिलदार असावा, असे वाटत होते. पण 'देवाभाऊ'आता खराब संगत लागली आहे. आधीची भाजप चांगली होती. पण आताची भाजपला चांगली संगत नाही"

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com