Uttam Jankar, Jayant Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Jayant Patil News : 'उत्तम जानकरांचं अन् माझं ठरलंय!' जयंत पाटलांनी वाढवली भाजपची धडधड

Uttam Jankar Malshiras : आता माढ्याची चिंता करू नका. सांगोला, माण खटावची चिंता करू नका, फलटणकरांचा आशीर्वाद तर आपल्याला आहेच. मात्र धैर्यशील मोहिते पाटलांचं ठरल्यानंतर मला उत्तमराव जानकरांचा फोन आला होता.

Sunil Balasaheb Dhumal

Malshiras Political News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटलांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यावेळीच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी माळशिरस विधानसभेचा निकाल सांगितला. भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे शरद पवारांची साथ देणार असल्याची चर्चा सुरू झाली. त्यावेळी भाजपचे नेते उत्तम जानकरांनी फोन करून मोहिते पाटलांची साथ देणार असल्याचे स्पष्ट केल्याचे जयंत पाटलांनी सांगितले. 'जानकरांचं आणि माझं ठरलंय!', असे म्हणत पाटलांनी भाजपची धडधड वाढवली आहे. Jayant Patil Told that Uttam Jankar is in Contact.

अकलूज येथील विजयसिंह मोहिते पाटलांच्या Vijaysingh Mohite Patil 'शिवरत्न' या निवासस्थानी धैर्यशील मोहिते पाटलांनी तुतारी हाती घेतली. जयंत पाटलांनी माढ्यातून त्यांची उमेदवारी घोषित केली. त्यामुळे येथून भाजपचे रणजीतसिंह नाईकनिंबाळकर विरुद्ध शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील अशी मोठी लढत होणार आहे. माढ्याचा उमेदवार देतानाच पाटलांनी माळशिरसबाबत विधानसभेबाबतही सूचक विधान केले आहे.

जयंत पाटील Jayant Patil म्हणाले, आता माढ्याची चिंता करू नका. सांगोला, माण खटावची चिंता करू नका, फलटणकरांचा आशीर्वाद तर आपल्याला आहेच. मात्र धैर्यशील मोहिते पाटलांचं ठरल्यानंतर मला उत्तमराव जानकरांचा फोन आला होता. ते म्हणाले, तुम्ही करताय ते चांगले करताय. आम्ही दोघेही एक होणार आहे. मीही त्यांना साथ देणार आहे. आता जानकरांचं आणि माझंही ठरले आहे, असे म्हणत माढ्यासाठी जानकर मोहिते पाटालांना मदत करतील, असेच पाटलांनी सूचवले.

आमच्या एका मित्राला नेण्यासाठी विमान आले. मात्र गेल्या काही वर्षांत काय झाले आणि मागील दहा दिवसांत माझ्याशी झालेली काय चर्चा झाली, यातून ते सदसदविवेक बुद्धीने निर्णय घेतली. मागच्या वेळी जानकर Uttam Jankar आमचे उमेदवार होते. त्यांच्यासाठी प्रचंड प्रयत्न केले पण काही जमलं नाही. मात्र पुढच्यावेळी ही जागा 20 ते 25 हजार मताधिक्याने निवडून आणण्यासाठी काम करावे लागणार आहे, असेही पाटील म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, जानकरांनी वैर विसरून लोकसभेत मोहिते पाटलांना मदत करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर धैर्यशील यांच्या शरद पवार Sharad Pawar गटातील पक्षप्रवेशापूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जानकरांसाठी खास विमान पाठवून नागपूरला बोलावून घेतले. ते तेथून दिल्लीला जाऊन अमित शाह यांच्याशी पुढील वाटाघाटी करण्याची शक्यता आहे. यानंतरही पाटलांनी केलेले विधानाने मात्र भाजपची झोप उडणार असल्याची चर्चा आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT