Mohite Patil News : निंबाळकरांना तिकीट मिळाल्यावर घरी बसायची तयारी केली होती; पण... : धैर्यशील यांनी सांगितली उमेदवारीमागची गोष्ट

Lok Sabha Election 2024 : कारभारी नीट असेल तर घर चांगलं चालतं. त्यामुळे सोलापूर जिल्ह्याला आणि माढा लोकसभा मतदारसंघाला चांगला कारभारी पाहिजे. चांगल्या कारभाराची शिकवण आम्हाला घरातूनच मिळाली आहे. आता तुम्ही सांगा मी काय निर्णय घ्यायचा, अशी विचारणा धैर्यशील मोहिते पाटील यांनी उपस्थितांना केली. त्यावेळी उपस्थितांनी ‘तुतारी घ्या, तुतारी....’ असा प्रतिसाद दिला.
Dhairyasheel Mohite Patil
Dhairyasheel Mohite Patil Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 14 April : मी वर्षाला एक लाख कोटी आणले. तासाला हजार कोटी आणले, असं एक महाशय मतदारसंघात बोलत सुटला आहे. त्या महाशयला खासदाराने काय काम करायची असते, तेही माहिती नाही. मी केंद्र सरकारची दिव्यांगासाठीची योजना मतदारसंघात राबविली. दिव्यांगांना केंद्राच्या योजनेतून मिळणारे साहित्य प्रथम माळशिरसमध्ये वाटले. पण, त्यानंतर दिव्यांगांचे साहित्य वाटप त्या महाशयाने फोन करून थांबवले. ते साहित्य गोदामात आजही पडून आहे. पक्षाचे पदाधिकारी नेमतानाही त्यांचा हस्तक्षेप असायचा. ज्यांनी मतं टाकली नाहीत, ती लोकं खासदारांच्या गाडीत असतात, अशा शब्दांत धैर्यशील मोहिते पाटील यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर टीकास्त्र सोडले.

धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांनी आज (ता. १४ एप्रिल) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. अकलूजमध्ये (Akluj) झालेल्या मेळाव्यात धैर्यशील यांनी खासदार निंबाळकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Dhairyasheel Mohite Patil
Dhairyasheel Mohite Patil join NCP : एका रात्रीत आमदार केलेलं पार्सल पुन्हा एका रात्रीत बीडला माघारी पाठवू’ ; मोहिते पाटलांचा सातपुतेंवर हल्लाबोल

ते म्हणाले, दिवाळी पाडव्याच्या दिवशी मी खासदारकीसाठी इच्छूक आहे, असे सांगितले होते. त्यानंतर मी मतदारसंघात फिरलो. पण, १३ मार्चला त्यांची उमेदवारी जाहीर झाली. त्यावेळी घरी बसण्याची तयारी केली होती. पण, मतदारसंघातील लोकांनी जयसिंह मोहिते पाटील आणि विजयदादांना फोन केले. त्यांनी मला भेटायला पाठविण्याची विनंती केली. त्यानुसार मी भेटायला गेलो. करमाळा तालुक्यातील एका तरुणाने तर ‘मला उभं राहायचं असेल, तर गावात यायचं, नाही तर माघारी जायचं’ असं थेट सुनावले, त्यामुळे मी निवडणूक लढविण्याचे ठरविले.

कारभारी नीट असेल तर घर चांगलं चालतं. त्यामुळे सोलापूर जिल्ह्याला आणि माढा लोकसभा मतदारसंघाला चांगला कारभारी पाहिजे. चांगल्या कारभाराची शिकवण आम्हाला घरातूनच मिळाली आहे. आता तुम्ही सांगा मी काय निर्णय घ्यायचा, अशी विचारणा धैर्यशील मोहिते पाटील यांनी उपस्थितांना केली. त्यावेळी उपस्थितांनी ‘तुतारी घ्या, तुतारी....’ असा प्रतिसाद दिला.

Dhairyasheel Mohite Patil
Fadnavis Call to Jankar : मोहिते पाटलांबरोबर एकत्र येण्याचे संकेत देणाऱ्या जानकरांना फडणवीसांकडून भेटीचा सांगावा

मोहिते पाटील म्हणाले, काहींनी विचारलं की, पवारसाहेबांना तुम्ही सोडलं. त्याचं उत्तर मी द्यायची गरज नाही. गेल्या ६० ते ६० वर्षांत पवारसाहेब आणि विजयदादांनी ऋणानुबंध जपले आहेत. आम्ही पक्ष का सोडला, हे महेबूब शेख यांनी सांगितले आहे. त्यामुळे तो प्रश्न विचारण्याच्या भानगडीत पडू नका. विजयदादा, पवारसाहेब आणि सुशीलकुमार शिंदे यांचा दोस्ताना सर्व महाराष्ट्राने पाहिला आहे.

मोहिते पाटील यांच्या तीन पिढ्यांवर तुम्ही जे प्रेम करत आहात. त्याला थोडाही तडा मी जाऊ देणार नाही, असे विश्वास मी तुम्हाला देतो. आजपासून तुमच्या सांगण्यावरून मी तुतारी हाती घेत आहे, अशी घोषणा ही धैर्यशील मोहिते पाटील यांनी केली.

Dhairyasheel Mohite Patil
Vijayshinh Mohite Patil News : अडचणीतील पवारांच्या मदतीला विजयदादाही येणार; लवकरच शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश होणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com