Uttam Jankar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ncp News : दगाफटका होऊ नये म्हणून काळजी घेतो अन् ठरवल्याप्रमाणे करेक्ट कार्यक्रम; जानकरांनी फलटण गाजवलं

Political News : लोकसभा निवडणुकीवेळी मी आणि धैर्यशील मोहिते-पाटील यांनी शरद पवार पक्षात प्रवेश करीत विजयश्री खेचून आणली होती. त्यामुळे वातावरण पूर्णपणे बदलून गेले असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते उत्तम जानकर यांनी स्पष्ट केले.

Sachin Waghmare

Satara News : लोकसभा निवडणुकीपूर्वीच संजीवराजे निंबाळकर (बाबा) शरद पवार गटात प्रवेश करतील असे वाटत होते. मात्र, त्यावेळी त्यांनी प्रवेश करणे टाळले होते. मात्र, आता योग जुळून आल्याने त्यांनी प्रवेश केला आहे. लोकसभा निवडणुकीवेळी मी आणि धैर्यशील मोहिते-पाटील यांनी शरद पवार पक्षात प्रवेश करीत विजयश्री खेचून आणली होती. त्यामुळे वातावरण पूर्णपणे बदलून गेले असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते उत्तम जानकर यांनी स्पष्ट केले.

फलटण येथे रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Nimbalkar) यांचे बंधू संजीवराजे निंबाळकर आणि त्यांचे सुपुत्र अनिकेत निंबाळकर यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या प्रवेशसोहळ्या प्रसंगी बोलताना उत्तम जानकर यांनी महायुती सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली. (Ncp News)

या ठिकाणच्या पूर्वीच्या माणसाने स्वतःच्या घराभोवतालची घरे पेटवली होती. मात्र, सगळ्याची घरे पेटवल्यानंतर आपले घर पेटेल याचा विचार त्यांनी केला नव्हता. त्यामध्ये त्यांचेही घर जळून खाक झाले. या पूर्वीच्या खासदाराने फलटण तालुक्यसोबतच सर्वत्र धुमाकूळ घातला होता. त्यामुळे संजीवराजे, मी, मोहिते-पाटील कुटुंबांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

त्यावेळी कोणासोबत दगाफटका होऊ नये म्हणून आम्ही काळजी घेत होतो. त्यानंतर ठरवल्याप्रमाणे करेक्ट कार्यक्रम झाला. हा कार्यक्रम यशस्वी झाला पाहिजे म्हणून आम्ही काम करीत होतो, असेही जानकर यांनी स्पष्ट केले.

या ठिकाणच्या माणसाने ईडी व अनेक यंत्रणांचा वापर केला होता. मात्र आम्ही सर्वांनी निश्चय केला होता. त्यामुळे काही त्रास झाला नाही. आता येत्या काळात होत असलेल्या निवडणुकीसाठी आम्ही सज्ज झालो आहोत. त्यासाठी आणखी काही सभा घेण्याची माझी तयारी असल्याचे जानकर यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT