Sanjeevraje Nimbalkar News : शरद पवारांच्या पक्षात पाऊल ठेवताच संजीवराजे निंबाळकरांचा मोठा आरोप; म्हणाले,...

Political News : रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे निंबाळकर आणि त्यांचे सुपुत्र अनिकेत निंबाळकर यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. या प्रवेशानंतर बोलताना संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
Sanjeevraje Nimbalkar
Sanjeevraje NimbalkarSarkarnama
Published on
Updated on

Satara News : विधानसभा निवडणुकीची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात मोठ्या प्रमाणात नेत्यांचे इनकमिंग सुरू आहे. यातच शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुन्हा एकदा एक मोठा धक्का दिला आहे.

रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे निंबाळकर आणि त्यांचे सुपुत्र अनिकेत निंबाळकर यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. या प्रवेशानंतर बोलताना संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

आपल्याला साम, दाम, दंड भेद सगळे वापरा असे दिल्लीतील नेत्यांनी सांगितले आहे. मात्र, त्यांनी काहीही वापरले तरी आपण स्वाभिमानी आहोत. सातारा हा स्वाभिमानी आहे आणि दिल्लीवर राज्य करणारा सातारा जिल्हा आहे. त्यामुळे दिल्लीसमोर आम्ही झुकणारे नाही. भाजपचे वरिष्ठ नेते वेगळ्या प्रकारचे राजकारण करत आहेत. त्यामुळे आपल्याला वेगळा निर्णय घ्यावा लागला. त्यामुळे महाराष्ट्र आणि देशाला शरद पवारसाहेबांशिवाय पर्याय नसल्याची प्रतिक्रिया संजीवराजे नाईक निंबाळकर (Sanjeevraje Nimabalkar) यांनी प्रवेशानंतर प्रसार माध्यमाशी बोलताना व्यक्त केली आहे.

Sanjeevraje Nimbalkar
Madhuri Misal : 'पर्वती मतदारसंघातून मीच लढणार', उमेदवारीवर माधुरी मिसाळ ठाम

फलटण, माळशिरस, माण तालुक्यातील पाणी दुसरीकडे नेण्याचा जो प्रयत्न केला जात आहे, त्याला आळा घालण्यासाठी आपण हा निर्णय घेतला आहे. रामराजे, रघुनाथराजे आणि माझे राजकारण अपक्ष म्हणून सुरू झाले. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. शरीराने एका बाजूला होतो आणि मनाने एका बाजूला होतो हे तुम्हाला माहिती असल्याचे संजीवराजे निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

फलटणचे विद्यमान आमदार दीपक चव्हाण (Deepak Chavan) यांच्यासह संपूर्ण राजे गट उपमुख्यमंत्री अजित पवारांची साथ सोडत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शनिवारी सहभागी झाला आहे. त्यामुळे येत्या काळात सातारा जिल्ह्यातील वातावरण बदलणार आहे. त्यामुळे त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Sanjeevraje Nimbalkar
Vinod Tawde : ठाकरेंवर संतापले अन् कॅबिनेटच्या निर्णयाने सुखावले! विनोद तावडेंना झाली वाजपेयींसह मुंडेंची आठवण

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com