Akshay Bhosale, Bageshwar  Maharaj
Akshay Bhosale, Bageshwar Maharaj Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Bageshwar Maharaj : संत तुकाराम महाराजांचा अपमान केलेल्या धर्मेंद्र शास्त्रींवर वारकरी संतापले

सरकारनामा ब्युरोे

Sant Tukaram Maharaj : श्री संत तुकाराम महाराज यांना त्यांची पत्नी रोज मारत असे म्हणून ते देवावर प्रेम करु लागले, असे वादग्रस्त विधान धर्मेंद्र शास्त्री ऊर्फ बागेश्वर महाराजांनी (Dharmendra Shashtri) केले आहे. यावरुन राज्यातील वारकरी संप्रदायासह राजकीय पदाधिकारीही संताप व्यक्त करीत आहेत.

बागेश्वर महाराजांच्या (Bageshwar Maharaj) विधानाचा वारकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी समाचार घेण्यास सुरूवात केली आहे. याबाबत धर्मवीर अध्यात्मिक सेना (बाळासाहेबांची शिवसेना (Shinde Group) कार्याध्यक्ष अक्षयमहाराज भोसले (Akshay Bhosale) यांनी संत श्री तुकाराम महाराजांचा अपमान कदापी सहन केला जाणार नाही असा इशारा दिला.

भोसले म्हणाले, "समाजाला अंधश्रद्धेपासून दूर लोटून भक्तीच्या मार्गावर आणणारे संत म्हणजे श्री तुकोबाराय.आईसाहेब जिजाई यांचे इतकी थोर पतिव्रता पाहता येणे दुर्मिळ. आयुष्यभर आपल्या पतीने भोजन केल्याशिवाय ज्या माऊलीने भोजन केलं नाही, त्या माऊली विषयी बोलताना संबंधितांनी मर्यादा बाळगली पाहिजे होती."

पुढे भोसले म्हणाले, "ज्यांना देव प्रथम भेट देतो त्या संतवर्य जिजाई आईसाहेबांचा अधिकार खूप मोठा होता. त्यांच्याबद्दल चुकीचे विधान करणे हे महाराष्ट्र खपवून घेणार नाही. संत श्री तुकाराममहाराजांचा अपमान कदापी सहन केला जाणार नाही. मग समोरचा व्यक्ती कोणीही असो. धीरेंद्र शास्त्रीचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो", असेही भोसले म्हणाले.

आपल्या चमत्काराच्या दाव्यामुळे अडचणीत आलेले बागेश्वर बाबाने आता आणखी एक कारनामा समोर आला आहे. संत तुकाराम महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करत त्याने नव्या वादाला फोडणी दिली आहे. 'संत तुकाराम महाराजांना त्यांची पत्नी रोज मारहाण करायची म्हणून त्यांनी देवाचा धावा केला. अशी मुक्ताफळे बागेश्वर बाबाने उधळली आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT