Shiv Sainiks join BJP
Shiv Sainiks join BJPSarkarnama

Konkan News : कोकणात ठाकरे गटाची पडझड थांबेना; हजारो शिवसैनिक शिवबंधन तोडून भाजपात जाणार

विभागप्रमुख सुधीर ठोंबरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर चौक भागात शिवसेनेत खळबळ उडाली आहे. शिवसेना सोडण्याची तालुक्यात लाट आली आहे.
Published on

खालापूर (जि. रायगड) : खालापूर (Khalapur) तालुक्यात शिवसेनेची (Shivsena उद्धव बाळासाहेब ठाकरे) पडझड थांबायचे नाव घेत नाही. येत्या मंगळवारी (ता. ३१ जानेवारी) तालुक्यातील सरपंचांसह सुमारे पाच हजार शिवसैनिक शिवबंधन तोडून कमळ हाती घेणार असल्याची माहिती आहे. खालापूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून भाजप (BJP) प्रवेशाची लाटच आली आहे. (Thousands of Shiv Sainiks from Khalapur will join BJP)

खालापूर तालुक्यातील चौक जिल्हा परिषद विभागातून चौक, बोरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचांसह हजारो कार्यकर्ते मंगळवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला बालेकिल्ल्यातच जोरदार हादरे बसत आहेत.

Shiv Sainiks join BJP
Rajendra Raut News : सरकारला ‘पै न्‌ पै’चा हिशेब देऊ; पण माझ्याशी वाईट वागणाऱ्यांना धडा शिकवू : राऊतांचा इशारा

चौक जिल्हा परिषद शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) विभागप्रमुख सुधीर ठोंबरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर चौक भागात शिवसेनेत खळबळ उडाली आहे. शिवसेना सोडण्याची तालुक्यात लाट आली असून दोन दिवसांपूर्वी लोधीवली गावातून तीनशे कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता.

Shiv Sainiks join BJP
NCP News : ‘दशरथ माने चेअरमन होतील; म्हणूनच भरणेंनी ‘कर्मयोगी’ची निवडणूक सोडून दिली’ : राष्ट्रवादीच्या माजी नेत्याचा गौप्यस्फोट

दरम्यान, येत्या ३१ जानेवारीला सुधीर ठोंबरे शक्तिप्रदर्शन करणार असून चौक ग्रामपंचायत सरपंच रितू ठोंबरे, बोरगाव ग्रामपंचायत सरपंच प्रीतेश मोरे, माजी सरपंच प्रवीण मोरे, अनेक ग्रामपंचायत सदस्यासह हजारो शिवसैनिक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत सुधीर ठोंबरे शक्ती प्रदर्शन करणार असून जवळपास पाच हजार शिवसैनिक भाजपमध्ये प्रवेश करतील, असा दावा ठोंबरे यांच्याकडून केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com