वसंत मोरे यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.
यामुळे त्यांना अटक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Pune News : शिवसेना ठाकरे सेनेचे नेते वसंत मोरे यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका पत्रकार परिषदेत विश्वनाथ लहाडे यांचा उल्लेख करत त्यांच्याबाबत आक्षेपार्ह आणि बदनामीकारक वक्तव्य केल्याचा आरोप आहे. प्रकरणाची आज कोर्टात सुनावणी झाली.
काही दिवसापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये वसंत मोरे यांनी विश्वनाथ लहाडे यांचा उल्लेख करताना त्यांच्याबाबत आक्षेपार्ह आणि बदनामीकारक वक्तव्य केल्याबाबत वसंत मोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पुणे महानगरपालिकेत वसंत मोरे यांनी २५ फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत "लहाडे दारू पिला होता त्याला बोलता येत नव्हतं ओढ्यामध्ये उतरून गटारे साफ करत होता', असं वक्तव्य वसंत मोरे यांनी केलं होतं असं फिर्यादीने सांगितले होते.
हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादींनी या वक्तव्यामुळे त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचल्याचे आणि समाजातील स्थानावर परिणाम झाल्याचे म्हटले होते.
या प्रकरणात वसंत मोरे यांनी अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. मात्र पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने अर्ज नाकारला आहे. ॲड. आकाश साबळे सर, ॲड. कपिल शिवशरण यांनी जोरदार युक्तिवाद करत फिर्यादींच्या वतीने बाजू मांडली.
या वेळी फिर्यादी अविनाश लहाडे आणि वंचित बहुजन आघाडीचे ओंकार कांबळे, अभिजीत बनसोडे, युवा आघाडीचे अक्षय कांबळे, विपुल सोनवणे आणि अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. याबाबत वसंत मोरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
1. वसंत मोरे यांच्यावर कोणता गुन्हा दाखल आहे?
अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
2. कोर्टाने काय निर्णय दिला?
अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.
3. हा गुन्हा का दाखल झाला?
आक्षेपार्ह आणि बदनामीकारक वक्तव्य केल्यामुळे.
4. पुढे काय होऊ शकते?
त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.
5. हा प्रकार कुठे घडला?
पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात प्रकरण नोंदवले गेले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.