Vasantrao Mankumare and Nitin Kaka Patil
Vasantrao Mankumare and Nitin Kaka Patil sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

वसंतराव भाऊ जरा सबुरीने घ्या : नितीन काका पाटीलांचा मानकुमरेना सल्ला

रविकांत बेलोशे

भिलार : जिल्हा बँकेच्या निवडणुकीची जखम अजूनही ताजी असून जावली बँकेला (Bank Election) निवडणूक परवडणारी नाही. वसंतराव भाऊ समन्वय साधा आणि जरा सबुरीने घ्या, असा सल्ला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष नितीन काका पाटील (Nitin Kaka Patil) यानी वसंतराव मानकुमरे (Vasantrao Mankumare) यांना दिला. तापोळा येथे विठ्ठल धनावडे यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी महाबळेश्वर तालुक्याच्या माजी सभापती सौ अंजना कदम यांच्या निवासस्थानी या नेत्यांची जावली बॅंकेच्या निवडणूक विषयी गप्पा रंगल्या. या वेळी नितीन काकांनी मानकुमरे यांना सल्ला दिला.

यावेळी सातारा मध्यवर्ती बँकेचे (Satara District Bank) अध्यक्ष नितीन काका पाटील यांचेबरोबर जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे, महाबळेश्वर तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष बाबुराव सकपाळ, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे, समन्वय समितीचे माजी अध्यक्ष प्रवीण भिलारे, तुकाराम तात्या धनावडे व इतर मान्यवर उपस्थित होते.

जिल्हा बँकेची जखम ताजी असल्याने आमची अडचण होणार असे नितींनकाका बोलताच मी तसा निरोप दिला, शिंदे साहेबाना मी काय या निवडणुकीत पडणार नाही. तुम्हीच निर्णय घ्या असे वसंतराव मानकुमरे यांनी सांगितले. बँक कुणाच्याही ताब्यात गेली तरी आजच्या काळात चालवणे खूप अवघड असल्याचे तुकाराम धनावडे यांनी सांगितले. वसंतराव यांनी जे वाद करून ठेवला त्यामुळे नवीन फळीची दुफळी होवू नये अशी आमची इच्छा आहे. निवडणुकीला आम्ही उभे राहणार नाही तर माणस तीच राहणार आहेत. त्यांच्यातील लोकांना संधी देणार असल्याचेही नितीन काका यांनी सांगितले. मकरंद आबा आणि शिंदे साहेब यांनीच निर्णय घ्यावा, आम्ही पाठींबा देवू असेही शेवटी वसंतराव मानकुमरे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT