शैलेश पेटकर
Sangli News: सांगलीतील हमाल नेते बाळासाहेब बंडगर यांचा 14 वर्षीय नातू वेदांत बंडगर याची डोळ्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. सांगलीतल्या वेदांत बंडगर या14 वर्षाच्या मुलाची डोळ्यात गोळी झाडून निर्घृण हत्या केल्याच्या घटनेनंतर सांगलीत संतापाची लाट उसळली होती.
या हत्येप्रकरणातील मुख्य सूत्रधार निलेश गडदे याला चार दिवसानंतर पोलिसांनी मैत्रिणीसोबत कर्नाटक बॉण्ड्रीवरील एका लॉजवरून ताब्यात घेतले होते. या प्रकऱणात एक धक्कादायक अपडेट समोर येत आहे.
वेदांत बंडगर यांचा गोळी घालून निर्घृण खून करण्यात आला. यानंतर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली. याप्रकरणी मुख्य सूत्रधार नीलेश विठोबा गडदे, किरण लोखंडे, विशाल चौगुले, सागर चौगुले आणि अतुल वायदंडे यांच्यावर संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.
दरम्यान, आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती निरीक्षक प्रविणकुमार कांबळे यांनी दिली. याप्रकरणी मुख्य सूत्रधार नीलेश विठोबा गडदे, किरण लोखंडे, विशाल चौगुले, सागर चौगुले आणि अतुल वायदंडे यांच्यावर संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सांगली पोलिसांनी अतुल वायदंडे याला यापूर्वीच अटक केली होती. त्यानंतर मुख्य सूत्रधार निलेश गडदे याला सोमवारी अटक केली होती. दोघेही सध्या पोलिस कोठडीत आहेत. यातील संशयित किरण, विशाल आणि सागर हे तिघेही पसार होते. त्यांच्या शोधासाठी एलसीबीची पथके रवाना करण्यात आली आहे.
दरम्यान, सागर चौगुले याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यास मिळाली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. कवठेमहांकाळमध्ये त्याच्यावर प्रथमिक उपचार झाले. त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी मिरजेतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती स्थिर आहे. त्याने आत्महत्येचा प्रयत्न का केला? याचा पोलिस शोध घेत आहे. पसार असणाऱ्या संशयिताच्या या कृत्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.