Maharashtra IAS News: फडणवीस सरकारकडून पुन्हा एकदा प्रशासनात मोठी उलथापालथ; 12 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

Maharashtra Government : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर काहीच तासांतच संबंधित 12 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यामुळे प्रशासकीय यंत्रणांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
Maharashtra cadre IAS news
Maharashtra cadre IAS newsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: राज्य सरकारने मंगळवारी (ता.१६) पुन्हा एकदा प्रशासनात मोठे फेरबदल केले आहेत. महायुती सरकारच्या दुसर्‍या टर्ममध्ये सातत्यानं वरिष्ठ आयपीएस आणि आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्या होताना दिसून येत आहे. फडणवीस सरकारकडून पुन्हा एकदा वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

भारतीय प्रशासकीय सेवेतील 12 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्त्यांचे आदेश मंगळवारी काढण्यात आले. सरकारकडून करण्यात आलेल्या या बदल्यांमध्ये सिडको,एमएमआरडीए, धारावी पुनर्विकास प्रकल्प,महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ ), बृहन्मुंबई महानगरपालिका तसेच जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या यांसारख्या महत्त्वाच्या पदांचा समावेश आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर काहीच तासांतच संबंधित 12 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यामुळे प्रशासकीय यंत्रणांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त महानगर आयुक्तपदावरून डॉ. अश्विनी जोशी यांची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथे अतिरिक्त महानगर आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्राजक्ता वर्मा यांची जोशी यांच्या जागी बदली करण्यात आली आहे.

Maharashtra cadre IAS news
Shiv Sena UBT MPs Delhi : महाराष्ट्रात मध्यरात्रीनंतर मोठा राजकीय स्फोट? ‘ऑपरेशन टायगर’ अंतिम टप्प्यात? ठाकरेंच्या सहा खासदारांपाठोपाठ एकनाथ शिंदे दिल्लीत?

सिडकोच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदावरून विजय सिंघल यांची धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी विशेष कर्तव्य अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याचवेळी अश्विन मुदगल यांची सिडकोच्या नवीन व्यवस्थापकीय संचालकपदी बदली करण्यात आली आहे.

याचदरम्यान,राज्य सरकारने वेलारसू यांची एमआयडीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून बदलीचे करण्यात आली असून त्यांच्याकडे महसूल व वन विभागातील सचिव (वन) पदाची जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्याजागी दीपेंद्रसिंग कुशवाह यांची एमआयडीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Maharashtra cadre IAS news
Pune News: आमदार राहुल कुल यांना मोठा धक्का,भाजपच्या जवळ असलेल्या नगरसेवकाचे पद जाणार? पहिलं बोगस कुणबी प्रमाणपत्र सापडलं

वरिष्ठ आयएएस अधिकारी अश्विन मुदगल यांच्याकडे सिडकोच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच डॉ. कादंबरी बलकवडे यांची विकास आयुक्त (उद्योग) पदी बदली करण्यात आली आहे.

कुटुंब कल्याण आयुक्त आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक पदाची जबाबदारी संजय काटकर यांच्याकडे देण्यात आली आहे. राज्यातील जिल्हा परिषदांमध्येही महत्त्वाच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

Maharashtra cadre IAS news
Vanchit Bahujan Aghadi: नगरसेवकांचे गोव्यातील व्हिडिओ समोर, 'वंचित'चा उमेदवार संतापला; 'नांदेड'ची निवडणूकच रद्द करण्याची आयोगाकडे मागणी

तसेच गोंदिया जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारीपदी जेनिथ चंद्रा डोनथुला तर अकोला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अनय नावंदर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

याचवेळी नांदेड येथील आयटीडीपी प्रकल्प अधिकारी व सहायक जिल्हाधिकारीपदी डॉ. बी. सरावनन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर लघिमा तिवारी यांना नंदुरबार येथील तळोदा आयटीडीपी प्रकल्प अधिकारी व सहायक जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com