Prithviraj Chavan, Narendra Modi
Prithviraj Chavan, Narendra Modi sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

मोदींमुळेच 'वेदांता' गुजरातला गेला; डबल इंजिन सरकार गप्प का... पृथ्वीराज चव्हाण

सरकारनामा ब्युरो

सातारा : महाराष्ट आणि मुंबईचे महत्व कमी करण्यासाठी वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातला पळवला. आज जे डबल इंजिनचे सरकार महाराष्ट्रात चालले आहे, त्याची किंमत राज्याला मोजावी लागत आहे. पंतप्रधान मोदींनी गैर पध्दतीने हस्तक्षेप करून कंपनीवर दबाव आणून हा प्रकल्प गुजरातमध्ये नेला, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

कराडमध्ये आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मोदींसह केंद्र व राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. चव्हाण म्हणाले, गुजरातचे या प्रकल्पासाठी कुठेही नाव नव्हते. हा प्रकल्प केवळ मोदींच्या हस्तक्षेपामुळे गेला. याबाबत सध्याचे राज्यातील डबल इंजिनच्या सरकारमधील कोणीच काहीही बोलत नाही.

महाराष्ट्रातील कोणत्या मंत्र्याने, उद्योगपतीने अहमदाबाद बुलेट ट्रेन करावी, अशी मागणी केली होती. बुलेट ट्रेनचा महाराष्ट्राला काय फायदा होणार आहे. या बुलेट ट्रेनचा ४० ते ४५ टक्के खर्च महाराष्ट्राने का उचलला आहे. अहमदाबादच्या लोकांना मुंबईला येण्यासाठी विमानसेवा आहे. मग, एवढी महागडी बुलेट ट्रेन पालघर, ठाणे या भागातून जाणार आहे.

याचा महाराष्ट्राला काय फायदा आहे, असा प्रश्न करून ते म्हणाले, मोदींच्या हट्टापायी हा प्रकल्प झालेला आहे. केवळ गुजरातचे महत्व वाढावायचे आणि मुंबईचे महत्व कमी करायचा हा प्रयत्न आहे. मुंबईतील बीकेसी येथील अत्यंत मोक्याची व हजारो कोटींची जागा या बुलेट ट्रेनसाठी दिलेली आहे. तेथे आता नवीन कंपन्या, बिझनेस येणार नाही. या सर्वाचा परिणाम केवळ मुंबईचे महत्व कमी करायचे हा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT