'वेदांता' वरुन अजितदादांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले : म्हणाले, 'मोदींना सांगून प्रकल्प महाराष्ट्रात आणा'

AJit Pawar |महाराष्ट्राला या बदलामुळे मोठा आर्थिक फटका बसणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने हा प्रकल्प परत आणण्यासाठी प्रयत्न करावा,
Devendra Fadnavis | AJit Pawar | Eknath Shinde
Devendra Fadnavis | AJit Pawar | Eknath Shinde Sarkarnama
Published on
Updated on

जळगाव :'वेदांता'वरुन पुन्हा एकदा विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुनावले. ते आज माध्यमांशी बोलत आहे. 'राज्याच्या हिताचे जे प्रकल्प आहेत, हे राज्यात आणावे, पर्यावरणाचे नुकसान होणार नाही, असे प्रकल्प राज्यात यायला हवे," असे अजित पवार म्हणाले.

अजित पवार म्हणाले, "'वेदांता'प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे राज्यातील दीड लाख लोकांना रोजगार हिरावला आहे, मुख्यमंत्री शिंदे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबध आहे, त्यामुळे त्यांनी मोदींना सांगून हा प्रकल्प महाराष्ट्र आणावा, दुसरा प्रकल्प येणार असल्याचे गाजर राज्य सरकारने दाखवू नये,"

काल (बुधवारी) अजित पवार यांनी या प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. वेदांता-फॉक्सकॉन हा प्रकल्प जाणे हा महाराष्ट्राच्या औद्योगीत विकास आणि रोजगारनिर्मितीसाठी मोठा धक्का असेल. महाराष्ट्राला या बदलामुळे मोठा आर्थिक फटका बसणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने हा प्रकल्प परत आणण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी करत राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे.

Devendra Fadnavis | AJit Pawar | Eknath Shinde
Shiv Sena : शिंदेंचे नाव बदलून 'श्रीमान खापरफोडे' ठेवायला हवे': शिवसेनेचा टोला

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टि्वट केले आहे. "वेदांता-फॉक्सकॉनच्या संलग्न प्रकल्पासाठी महाराष्ट्राची निवड करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल अनिल अग्रवाल यांचे आभार मानतो. महाराष्ट्रात गुंतवणूक यावी यासाठी आम्ही कायमच स्पर्धात्मक आणि व्यवसायपूरक राहू असेही फडणवीस यांनी ट्वीटमध्ये म्हटले.

विरोधकांवर टीका करताना त्यांनी म्हटले की, केवळ राजकीय स्वार्थीपणासाठी अतिशय चुकीचे, नकारात्मक आणि निराधार दावे केले जात आहेत. पण असे करून ते केवळ त्यांच्या अकार्यक्षमतेचेच प्रदर्शन करीत आहेत. महाराष्ट्रात 3.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक रिफायनरीच्या माध्यमातून येत असताना त्याला विरोध कुणी केला, हा प्रकल्प कुणी लांबविला?" स्वतः कार्यक्षम होण्यावर आधी लक्ष केंद्रीत करण्याचा सल्लाही देवेंद्र फडणवीस यांनी केला.

भाजप सरकार राज्यातील प्रकल्प फायद्यासाठी गुजरातला हलवले जात असल्याचा आरोप शिवसेना आणि विरोधकांकडून केला जात आहे. विरोधकांनी 'वेदांता'वरुन शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरले आहे. या प्रकरणावरुन विरोधक आणि सत्ताधारी यांच्या दावे-प्रतिवादे करण्यात येत आहेत. यावरुन शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'मधून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे.

"वेदांताबदल राज ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली पण त्यांच्याच मित्रानी 1 लाख तरुणांना रोजगार देणारा प्रकल्प हिरावून घेतला, महाराष्ट्राच्या प्रगतीचे सर्व डबे आणि इंजिन गुजरातला वळवतील हा धोका लक्षात घ्यावा," असा टोला अग्रलेखात लगावला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com