Sangli Market Committee Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Bazar Samiti : जयंतरावांनी सांगलीत मंत्री खाडे अन् संजयकाकांना धुळ चारली; आघाडीची निर्विवाद सत्ता

Sangli News : 18 पैकी 17 जागांवर महाआघाडीच्या उमेदवारांचा दणदणीत विजय झाला आहे.

सरकारनामा ब्यूरो

Sangli Bazar Samiti Results : सांगलीत महाविकास आघाडीने निर्विवाद सत्ता राखली आहे. देशातील अग्रगण्य बाजार समिती मानल्या जाणाऱ्या सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आघाडीने सत्ता मिळवली आहे. 18 पैकी 17 जागांवर महाआघाडीच्या उमेदवारांचा दणदणीत विजय झाला आहे.

तर एका जागेवर व्यापारी गटातून अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. या निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला. भाजपचे नेते कामगार मंत्री सुरेश खाडे (Suresh Khade), खासदार संजयकाका पाटील, माजी आमदार विलासराव जगताप यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil), काँग्रेस नेते विश्वजीत कदम, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील आणि माजी मंत्री अजित घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली आघाडीने दणदणीत विजय मिळवला.

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि. 28 एप्रिल) मतदान प्रक्रिया पार पडली. आज त्या अनेक बाजार समित्यांची निवडणूक निकाल जाहीर होत आहे. त्यामध्ये आता पर्यंत हाती आलेल्या निकालात महाविकास आघाडीने आघाडी घेतली आहे.

दरम्यान, संगमनेर बाजार समितीत तिसऱ्या फेरीतही काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांच्या (Balasaheb Thorat) पॅनलची आघाडी आहे. तिसऱ्या फेरीत महाविकास आघाडीचे 3 तर 1 अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे.

18 पैकी 11 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. यातील 10 जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळवला आहे. तर 1 जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. या ठिकाणी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र, अद्याप त्यांचा एकही उमेदवार विजयी झाला नाही. उर्वरित 7 जागांची मतमोजणी सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT