Solapur latest news
सोलापूर : गेल्या काही दिवसांपासून राज्यात लिंबाला अच्छे दिन आले आहेत. १० ते १५ रुपयांना एक लिंबू विकले जात आहे. असे असतानाच सोलापूरच्या वैराग येथील बाजारातील एका लिंबू विक्रेत्या शेतकऱ्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. “लिंबू १० रुपयाला दोन, घेतंय का कोण? का करु शरद पवाराला फोन”, असं म्हणत या शेतकऱ्याने ग्राहकांचं लक्ष वेधल आहे. दहा एकर बागायत असलेल्या या शेतकऱ्याने लिंबू विकताना आपली व्यथाही कवितेच्या ओळीतून मांडली आहे.
लिंबू विकताना शेतकरी म्हणतो, “लिंबू १० रुपयाला दोन, घेतंय का कोण? का करु शरद पवाराला फोन, होतील का शेतकरी करतील का बागायत, आणतील का वैरागच्या बाजारला. दोन लाख रुपये देतो म्हटंल पण पोरगी कुणी द्यायना शेतकऱ्याच्या पोराला, काय शेतकऱ्याची व्यथा सागांव, शेतकरी थांबला तर जग थांबल, ध्यानात ठिवा, दहा एकर बागायत आहे मामा पोरगी द्यायना कुणी पोराला, असे म्हणताना या शेतकऱ्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. प्रविण सिंधू नावाच्या व्यक्तीने हा व्हिडीओ शेअर केला आहे.
या शेतकऱ्याचे सध्या नाव समजलेले नाही, पण हा शेतकरी वैराग परिसरातीलच रहिवासीच असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, केंद्रात कृषीमंत्री पदी राहिलेल्या शरद पवार यांचं शेतीतील ज्ञानांच संपूर्ण राजकीय वर्तुळात कौतुक होत असतं. आजही शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे आणि शेतीचे प्रश्न समजून घेत असतात
यांच्या शेतीविषयक समजेचं राजकीय वर्तुळातून अनेकदा कौतुक होतं. दुसरीकडे वयाच्या या टप्प्यावरही शरद पवार शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतीप्रश्न समजून घेतात. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये त्यांना वेगळं स्थान आहे. व्हायरल व्हिडीओतील शेतकरी देखील शरद पवार यांचा उल्लेख करत शेतमालाच्या विक्रीचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे शरद पवार यांचा शेतकऱ्यांमधील प्रभावही यातून दिसतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.