राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अपक्षाला पाठिंबा नाहीच; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

Sanjay raut news छत्रपती संभाजीराजे यांनी राज्यसभेसाठी शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून होकार द्यावा, असा प्रस्ताव शिवसेनेने दिला होता.
Sanjay raut news
Sanjay raut news
Published on
Updated on

Sanjay Raut comments on Rajysabha seat

मुंबई: शिवसेना राज्यसभा निवडणुकीतील सहाव्या जागेसाठी कोणत्याही अपक्षाला पाठिंबा देणार नाही. मग तो कोणीही असो. राज्यसभेच्या दोन जागांवर शिवसेनेचाच उमेदवार उभा राहिल आणि निवडून जाईल, असा खुलासा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

आम्ही एक पाऊल पुढे टाकत शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवण्यासाठी आम्ही संभाजीराजे छत्रपती यांना सांगितले. तर संभाजीराजेंनीही एक पाऊल पुढे टाकायला हंव होतं. आमचा कोणालाही विरोध नाही. पण कोणत्याही परिस्थितीत राज्यसभेच्या दोन जागांवर शिवसेनेचेच दोन उमेदवार निवडून जाणार, ही गोष्ट मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्यावतीने सांगत आहे, माझ्या मनातलं काहीही सांगत नाही, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

Sanjay raut news
संभाजीराजेंनी शिवसेनेची ऑफर धुडकावली? पहाटेच सोडली मुंबई

खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी राज्यसभेसाठी शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून होकार द्यावा, यासाठी सुरू असलेल्या वाटाघाटी फिसकटल्याची माहिती समोर आली. त्यानंतर शिवसेनेने आता संभाजीराजे छत्रपती यांना पक्षात आणण्याचा विचार सोडून आणखी एक उमेदवार रिंगणात उतरवणार असल्याचे ठरवले आहे. त्यामुळे आता संभाजीराजे काय भूमिका घेतात, ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

संभाजीराजेंनी राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अपक्ष उभे राहण्याचे जाहीर केले असले तरी त्यांना अद्याप कोणत्याही पक्षाने पाठिंबा जाहीर केलेला नाही. संभाजीराजेंना जिंकण्यासाठी ४२ मतांची गरज आहे. पण संभाजीराजे यांच्याकडे तेवढी मते नसल्याने तेव्हा संभाजीराजेंनी शिवसेनेकडे मदत मागितली. पण आम्हाला आमचे २ उमेदवार राज्यसभेवर निवडून आणायचे आहेत, मग आम्ही त्यांना आमची मतं कशी देणार? असा सवाल संजय राऊत यांनी व्यक्त केला. आम्हाला शिवसेनेला उमेदवार निवडून आणायचा आहे. राज्यसभेतील संख्याबळ वाढवायचे आहे. त्यामुळे शिवसेनना कोणत्याही अपक्षाला पाठिंबा देणार नाही. असे संजय राऊतांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com