Vijay Wadettiwar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : काँग्रेस-शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील वाद चव्हाट्यावर? वडेट्टीवारांचा थेट सुळेंना इशारा, म्हणाले "तुम्ही कोणाच्या विमानातून..."

Vijay Wadettiwar on Supriya Sule : "पूर्वी जे भ्रष्टाचारी होते आणि ज्यांना ईडीची भीती होती, असे काही लोक आमच्या पक्षातून भाजपसोबत गेले. त्यामुळे काँग्रेस पक्ष आता शुद्ध झालेला आहे. आता पलीकडेच गोमूत्र शिंपडण्याची वेळ आली आहे."

Rahul Gadkar

Kolhapur News, 24 Aug : राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षातील अंतर्गत मतभेद आता हळूहळू समोर येताना दिसत आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी, "राज्यातील काँग्रेसचा आमच्यावर काय राग आहे, हे माहिती नाही," असे म्हटले होते.

त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. कोल्हापूर दौऱ्यावर असताना माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार यांनी सुळे यांच्या वक्तव्यावर थेट भाष्य केले. "राज्यातील काँग्रेस तुमचा राग करते, हा तर्क तुम्ही कुठून काढला? याबाबत आम्हाला कल्पना नाही.

मात्र, तुम्ही किती वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटता, याचा आम्हाला राग नाही. तुम्ही कोणाच्या विमानातून प्रवास केला, याचाही आम्हाला राग नाही," असे वडेट्टीवार म्हणाले. मात्र, या मुद्द्यावर सविस्तर बोलण्याची ही वेळ नसल्याचे सांगत त्यांनी अधिक भाष्य करण्यास नकार दिला.

"राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय काय सुरू आहे, याची आम्हाला सर्व माहिती आहे," असा सूचक इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, महायुतीवर टीका करताना वडेट्टीवार यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांवरही निशाणा साधला.

"पूर्वी जे भ्रष्टाचारी होते आणि ज्यांना ईडीची भीती होती, असे काही लोक आमच्या पक्षातून भाजपसोबत गेले. त्यामुळे काँग्रेस पक्ष आता शुद्ध झालेला आहे. आता पलीकडेच गोमूत्र शिंपडण्याची वेळ आली आहे," असा टोला वडेट्टीवार यांनी महायुतीला लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT