Ananda Jagdale, Lata Jagdale
Ananda Jagdale, Lata Jagdale sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Vaduj APMC : लग्नाच्या वाढदिनी मिळाली विजयश्री; पतीने केले पत्नीचे औक्षण...

Umesh Bambare-Patil

-आय्याज मुल्ला

Vaduj APMC : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या APMC Election निवडणुकीत खटाव विकास आघाडीच्या महिला राखीव मतदारसंघातून लता आनंदा जगदाळे Lata Jagdale या विजयी झाल्या. त्यामुळे त्यांचे पती आनंदा जगदाळे यांनी त्यांचे औक्षण करून आपल्या पत्नीचे कौतुक केले. विशेष म्‍हणजे जगदाळे दांपत्याच्या लग्नाच्या विसाव्या वाढदिवशीच त्यांना बाजार समिती निवडणुकीतील विजयश्री मिळाली.

जगदाळे यांच्या औक्षणाची व लग्नाच्या वाढदिवसाच्या या दुग्धशर्करा योगायोगाची नागरिकांत चर्चा होत आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या नेतृत्वाखालील खटाव तालुका विकास आघाडी व राष्ट्रवादी NCP, स्वाभिमानी शेतकरी संघटना पुरस्कृत शेतकरी सहकार पॅनेल यांच्यात दुरंगी व चुरशीची लढत झाली.

निवडणुकीत खटाव तालुका विकास आघाडीने १८ पैकी १३ जागा जिंकत बाजार समितीवरील सत्ता कायम ठेवली. निवडणुकीत खटाव तालुका विकास आघाडीतून महिला उमेदवार सौ. लता जगदाळे व सुनीता मगर या विक्रमी मतांनी निवडून आल्या.

जगदाळे यांचे माहेर वेळू (ता. कोरेगाव), तर सासर पेडगाव (ता. खटाव) आहे. त्‍या उच्चशिक्षित असून, त्यांना सहकार क्षेत्राबरोबरच महिला बचत गटाच्या कामाचाही अनुभव आहे. औक्षण करताना सासू श्रीमती सरूबाई जगदाळे, विद्या कोळी, कल्पना जाधव, सारिका घार्गे, संगीता दबडे आदी महिला उपस्थित होत्या.

बाजार समितीच्या निवडणुकीत खटाव तालुका विकास आघाडीतून पत्नी लता यांना वरिष्ठांनी उमेदवारीची संधी दिली. मतदारांनीही त्यांना चांगले मताधिक्य देऊन विजयी केले त्याबद्दल सर्वांचे आभार. पत्नी लता यांनी या निवडणुकीच्या निमित्ताने स्वत:मधील गुणवत्ता सिद्ध केल्याने त्यांच्या कर्तृत्वाचे विजयी औक्षण करताना आनंद होत आहे. आमच्या लग्नाच्या वाढदिवशीच ही विजयाची मिळालेली अनोखी भेट आयुष्यभर कायम लक्षात राहील.

- आनंदा जगदाळे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT