Nana Patole On BJP: नाना ‘ऑन दी स्पॉट’; म्हणाले, भाजप म्हणजे पाकिटमार..!

Congress News: प्रत्येकाने संघर्ष करण्याची गरज आहे.
Nana Patole
Nana PatoleSarkarnama

Nana Patole in Meeting at Devadiya Bhavan : भाजपच्या विरोधात नागरिकांमध्ये चीड आहे, केवळ असे समजून आपण निवडून येणार नाही. त्याकरिता प्रत्येकाने संघर्ष करण्याची गरज आहे. आपला प्रत्येक कार्यकर्ता जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे. याकरिता प्रभागनिहाय अध्यक्षांची नियुक्ती लवकरच केली जाणार असल्याची घोषणा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. (Ward wise presidents will be appointed soon)

ब्लॉक आणि प्रभाग अध्यक्षांनी आपली टीम तयार करावी आणि प्रत्येक नागरिकाच्या समस्या जाणून घ्याव्या. प्रत्येक प्रभागाची बैठक ही झालीच पाहिजे, असाही दम पटोले यांनी कार्यकर्त्यांना दिला. शहर काँग्रेस कमिटीची बैठक गुरुवारी (ता. ४ मे) देवडिया भवनात पार पडली. यावेळी तिकीट हवे असेल, तर देवडियात यावे लागेल असे नानांनी यावेळी सुनावले. सोबतच शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांना बैठकांना दांडी मारणाऱ्या नेत्यांचा रिपोर्ट सादर करण्याचे आदेशही पटोले यांनी दिले.

लाड खपवून घेणार नाही..

या बैठकीला माजी मंत्री नितीन राऊत, सतीश चतुर्वेदी, तानाजी वनवे, प्रफुल्ल गुडधे आदी नेते अनुपस्थित होते. महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला छुपी साथ देणाऱ्या आणि देवडिया काँग्रेस भवनात बैठकांना अनुपस्थित राहणाऱ्या नेत्यांचे लाड यानंतर खपवून घेणार नाही. अशा नेत्यांसह कार्यकर्त्यांवर ‘ऑन दी स्पॉट’ कारवाई करू, असा इशारा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला.

येणारा काळ कॉंग्रेसचाच..

पटोले म्हणाले, येणारा काळ काँग्रेसचाच आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सर्व धनशक्ती भाजपने लावली होती. मात्र सर्वाधिक बाजार समित्या काँग्रेसने जिंकल्या आहेत. हे काँग्रेससाठी शुभ संकेत आहे. गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत भाजपच्या विरोधात असंतोष खदखदत आहे. नागपूर महापालिकेत ओसीडब्ल्यूच्या माध्यमातून सार्वजनिक नळ बंद करण्यात आले आहेत. गोरगरिबांना सक्तीने विकत पाणी घ्यायला भाजपने भाग पाडले आहे. जी-२०च्या नावावर कोट्यवधी रुपये लुटवण्यात आले.

Nana Patole
Nana Patole News : संजय राऊतांनी चोमडेगिरी बंद करावी, ते आमचे प्रवक्ते नाहीत !

वीज चोरली..

चौकाचौकांमध्ये रोशणाईकरिता थेट वीज चोरण्यात आली होती. आता सर्वसामान्यांच्या विजेच्या बिलातून त्याची वसुली केली जात आहे. भाजप (BJP) म्हणजे पाकिटमार असून प्रत्येकाचा खिसा कापण्याचे काम सुरू आहे, असा थेट आरोपही यावेळी नाना पटोले यांनी केला. बैठकीला विकास ठाकरे यांच्यासह ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार, आमदार अभिजित वंजारी, प्रशांत धवड, दिनेश बानाबाकोडे, संदेश सिंगलकर, गजराज हटेवार, पुरुषोत्तम हजारे प्रामुख्याने उपस्थित होते.

देवडियातूनच एबी फॉर्म वाटणार..

विलास मुत्तेमवार म्हणाले, राहुल गांधी (Rahul Gandhi) आगे बढो हम सतरंजी संभालते है अशा घोषणा देऊन चालणार नाही. संघर्षाच्या काळात प्रत्येकालाच हातभार लावावा लागणार आहे. आज नाना पटोले (Nana Patole) असल्याने देवडियाच्या बैठकीला गर्दी झाली आहे. एरवी पूर्ण खुर्च्या भरत नाहीत. मनपा (Municipal Corporation) निवडणुकीचे एबी फॉर्म देवडियातूनच वाटप केले जाणार आहे. त्यामुळे इच्छुकांना देवडियात यावेच लागले असा इशाराही मुत्तेमवार यांनी पक्षांतर्गत विरोधकांना दिला.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com