vikram rathod
vikram rathod Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

विक्रम राठोड म्हणाले, पुतळा लोकार्पण कार्यक्रम राष्ट्रवादीने केला हायजॅक

मुरलीधऱ कराळे

अहमदनगर - अहमदनगर शहरातील मध्यवर्ती बसस्थानका जवळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण कार्यक्रम काल आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकऱ्यांनी इतर पक्षातील नेते व कार्यकऱ्यांना पुतळ्यापासून दूर ठेवत कार्यक्रमावर ताबा घेतल्याचा आरोप शिवसेनेचे दिवंगत उपनेते अनिल राठोड यांचे चिरंजिव तथा युवासेनेचे जिल्हा प्रमुख विक्रम राठोड ( Vikram Rathod ) यांनी 'सकाळ'शी बोलताना केला आहे. ( Vikram Rathore said that the statue of Chhatrapati Shivaji Maharaj was hijacked by the NCP )

विक्रम राठोड म्हणाले की, शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा लोकार्पण कार्यक्रम आमदार संग्राम जगताप व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी हायजॅक केला. शिवसेनेचे पदाधिकारी वेळेवर असताना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुद्दामहून येण्यास उशिर केला. शिवसेनेला मुद्दामहून बाजुला ठेवले. या प्रकाराचा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध केला, असा विक्रम राठोड यांनी केला.

ते पुढे म्हणाले, की अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या नगर शहरातील नुतनीकृत अश्वारुढ पुतळ्याच्या लोकार्पणाचा कार्यक्रम शहरातील विविध शिवप्रेमी संघटनांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह शहराच्या महापौर रोहिणी शेंडगे, शिवसेनेचे शहरप्रमुख संभाजी कदम, भगवान फुलसौंदर, संजय शेंडगे, दिलीप सातपुते, अभिषेक कळमकर तसेच कार्यकर्ते महाराजांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते.

या पुतळ्याच्या सुशोभिकरणासाठी महापौरांनी निधी उपलब्ध करून दिला. तरीही स्वतःचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहरातील आमदारांकडून या कार्यक्रमाचे निमित्त साधण्यात आले. कार्यक्रमस्थळी स्वतःचे बॅनर, पोस्टर झळकवून हा स्वतःचाच कार्यक्रम असल्याचे दाखविण्यात आले. लोकार्पण कार्यक्रमात शिवसेनेला सहभागी होता येऊ नये, यासाठी जाणीवपूर्वक राजकारण राष्ट्रवादीच्या आमदारांकडून करण्यात आले. या कृतीचा शिवसेना व शिवप्रेमींकडून निषेध करण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या लोकार्पण कार्यक्रमात राजकारण करण्याचे कारण नाही. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसने ते केले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रकाराचा निषेध केला आहे.

- विक्रम राठोड, जिल्हा प्रमुख, युवा सेना

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT