अहमदनगर : अहमदनगर शहरात 25 वर्षे शिवसेनेचे ( Shivsena ) आमदार राहिलेले दिवंगत अनिल राठोड यांचे पूत्र विक्रम राठोड ( Vikram Rathod ) यांना अज्ञात व्यक्तीने जिवे मारण्याची धमकी देणारे पत्र पाठविले आहे. त्यामुळे अहमदनगर शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. या संदर्भात युवा नेते विक्रम राठोड यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. Anil Rathore's son threatened to kill
फिर्यादीत म्हटले आहे, की अज्ञात व्यक्तीने पोस्टाद्वारे शिवसेनेच्या चितळे रस्त्यावरील कार्यालयात निनावी पत्र पाठविले. या पत्रात धमकी दिली आहे की, आगामी विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी तयारी करू नको, कारण तुझ्या बापाने नगरचा कधीच विकास केला नाही. तू तरी काय करणार. असे म्हणत शिवसेना कार्यकर्ते व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आले आहे.
या पत्रात पुढे म्हटले आहे की, संग्राम भैय्यांच्या निवडणुकीत पडला तर तुझ्या सकट सगळ्यांचा काटा काढू. असे म्हणत जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यामुळे नवीन राजकीय वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत.
दिवंगत माजी आमदार अनिल राठोड यांनाही अज्ञात व्यक्तीकडून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यावेळी जिल्हा प्रशासनाने त्यांना पोलिस संरक्षण दिले होते. विक्रम राठोड हे शिवसेनेचे जिल्ह्यातील युवा नेते आहेत. त्यांना धमकीचे पत्र मिळाल्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी चितळे रस्त्यावरील शिवसेना कार्यालयात गर्दी केली आहे. दाखल फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी कलम 507 अन्वये गुन्हा दाखल करून घेतला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.