MP Ranjitsinh Naik Nimbalkar
MP Ranjitsinh Naik Nimbalkar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Phaltan : उत्तर कोरेगावातील गावांना वसना योजनेतून पाणी मिळणार : रणजितसिंह निंबाळकर

Umesh Bambare-Patil

-राहूल लेंभे

Koregaon News : वसना उपसा जलसिंचन योजनेतून वगळलेल्या उत्तर कोरेगाव North Koregaon भागातील गावांना पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर Ranjitsinh Naik Nimbalkar यांच्या पुढाकाराने पुण्यातील सिंचन भवनात कृष्णा खोरे विकास महामंडळाचे अधिकारी आणि कोरेगावच्या उत्तर भागातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व शेतकऱ्यांची बैठक काल (गुरुवार) झाली. यावेळी शेतकरी व अधिकाऱ्यांमध्ये या योजनेबाबत विस्तृत चर्चा झाली.

खासदार निंबाळकर यांनी संबंधित खात्याला कामाच्या सूचना दिल्या आहेत. तत्पूर्वी बुधवारी धोम कालवा विभागाच्या अधिकाऱ्यांनी या परिसराची पाहणी केली होती. बैठकीत खासदार निंबाळकर म्हणाले, उत्तर कोरेगावमधील वंचित गावांना पाणी पोचवण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. त्यानुसार सर्कलवाडीचा घाटमाथा तलाव, करंजखोपचा आंबेदरी तलाव, रणदुल्लाबादचा पोकारणे तलाव आणि मोरबेंदच्या तलावात सोलर पंपाने पाणी सोडण्यात येईल. त्याचे आदेश संबंधित विभागाला दिलेत.

नांदवळ येथील धरणात काही गावांच्या सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरी आहेत. उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे यात्रा कालावधीत पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. त्याकरिता एप्रिलच्या प्रारंभी हे धरण पाण्याने विनामोबदला भरण्यात येईल. काही नेत्यांनी उत्तर कोरेगावमधील गावे त्याकाळी राजकीय हेतूने वगळली व आपली सतेची भूक भागवली.

तसेच भर सभेत सांगितले, की उत्तर कोरेगावने पाणी हा विषय सोडून बोलावे. त्यांनी बोगदे काढून हा भाग वगळून बाजूने पाणी पळवले. त्याचे कारण येथील जनतेनेच शोधावे. मी भारतीय जनता पार्टीचा सच्चा कार्यकर्ता आहे. पाणी हे जीवन असून या भागाला पाणी देण्यासाठी केंद्र व राज्य सरकार कटिबद्ध आहे. त्यामुळे आता पाणी हे शिवारात असेल, शेतकऱ्यांच्या डोळ्यात नाही.

यावेळी वसना योजनेतील वंचित गावांचा प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी देण्यात आला. कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री. कोपाळे, पुणे विभागीय प्रकल्प मुख्य अभियंता डॉ.धुमाळ,जलसंपदाचे मुख्य अभियंता श्री. गुणाळे, सातारा पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता श्री. शिंदे, धोम कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. विकास पाटील, दतात्रय धुमाळ, विजय चव्हाण, राजेंद्र धुमाळ, योगेश कर्पे, संतोष महांगडे, शेखर काटकर, दिलीप जगताप, अनिल शिंदे, व शेतकरी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT