Phaltan : रामराजेंनी मीठ खाल्लं फलटणचं; नीट केलं बारामतीचं... रणजितसिंह निंबाळकर

Ranjitsinh Naik Nimbalkar बिबी येथे ग्रामस्थांच्यावतीने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची पेढे तुला करण्यात आली. त्यानंतर जाहीर सभेत ते बोलत होते.
Ranjitsinh Naik Nimbalkar, Ramraje Naik Nimbalkar
Ranjitsinh Naik Nimbalkar, Ramraje Naik Nimbalkarsarkarnama
Published on
Updated on

Phaltan City News : भविष्यात फलटणचा इतिहास Phaltan History वाचला जाईल तेव्हा निरा देवघरच्या पाण्यासंदर्भात रामराजें Ramraje Naik Nimbalkar यांनी मीठ खाल्लं फलटणचं आणि नीट केलं बारामतीचं. यामुळे फलटणचे शेतकरी त्यांनी आमचं वाटोळं केल असं म्हणत त्यांना गद्दार म्हणून संबोधतील अशी टीका खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर Ranjitsinh Naik Nimbalkar यांनी केली.

बिबी येथे ग्रामस्थांच्यावतीने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची पेढे तुला करण्यात आली. त्यानंतर जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी जेष्ठ नेते प्रल्हादराव सांळुखे पाटील, भाजपचे तालुका अध्यक्ष बजरंग गावडे, अभिजित नाईक निंबाळकर आदींची यावेळी उपस्थिती होती.

हायड्रोलिक रिपोर्ट बदलून पाणी बारामतीला पळवण्याचा रिपोर्ट सीडब्ल्यूसीने दिलेला असून रामराजेंनी स्वतःचे मंत्रिपद वाचवण्यासाठी बारामतीकरांची चाकरी केली, अशी टीका करून खासदार निंबाळकर म्हणाले, पाऊण टीएमसी पाणी आणणारे व स्वतःला भगीरथ म्हणवणाऱ्यांनी निरा देवघरचे आपले पाणी बारामतीला दिले. ते पुन्हा आपण खासदार झाल्यावर तालुक्यात वळवले असून फलटण तालुक्याचा विकास हेच माझे व्हिजन असल्याचे खासदार निंबाळकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

Ranjitsinh Naik Nimbalkar, Ramraje Naik Nimbalkar
Satara News: संजय राऊतांची तोफ साताऱ्यात धडाडणार; शुक्रवारी शिवगर्जना मेळावा

यावेळी निरा देवधरची सुधारित प्रशासकीय मान्यता, त्यासाठी निधी उपलब्ध करून घेतला. रेल्वे,रस्ते, नाईकबोमवाडी एमआयडीसी करून फलटण तालुक्याचा चौफेर विकास केल्याने बीबी व परिसरातील ग्रामस्थांच्यावतीने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची पेढे तुला करुन त्यांना उदंड आयुष्य लाभो... अशा शुभेच्छा दिल्या.

Ranjitsinh Naik Nimbalkar, Ramraje Naik Nimbalkar
Phaltan : शरद पवारांच्या सहकार्यामुळेच नीरा देवघर प्रकल्प पूर्णत्वाला : रामराजे

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com