Vishal phate sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

विशाल फटेला पोलिसांचा दणका ; तीन बँक खाती गोठवली

विशाल फटेच्याविरुद्ध बार्शी शहर, पुणे, उस्मानाबाद पोलीस ठाण्यात गुंतवणूकदारांनी फसवणुकीची तक्रार दिली आहे. जवळपास २२ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे म्हटलं आहे.

सरकारनामा ब्युरो

सोलापूर : बार्शीकरांची कोट्यवधी रूपयांची फसवणूक केल्याचा आरोप असलेला विशाल फटे (Vishal Fate) याची तीन बँक खाती (Bank Acccounts) पोलिसांनी गोठवली आहेत. शेअर मार्केट अल्गोरिदमच्या नावाखाली बार्शीतल्या असंख्य नागरिकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप विशाल फटेवर आहे. सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने सध्या फटे प्रकरणाचा तपास सुरु आहे.

विशाल फटेच्याविरुद्ध बार्शी शहर, पुणे, उस्मानाबाद पोलीस ठाण्यात गुंतवणूकदारांनी फसवणुकीची तक्रार दिली आहे. जवळपास २२ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे म्हटलं आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर फसवणूकीचा आकडा 18 कोटींपर्यंत गेला होता. मात्र, तक्रारी वाढल्याने 22 कोटी 3 लाख 58 हजार 342 रुपयांपर्यंत गेलेली आहे. तक्रारींची संख्या आता 105 वर गेली आहे.

विशाल फटेचा मोबाइल, लॅपटॉप, महत्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आलेली आहेत. अधिकाधिक फसवल्या गेलेल्या लोकांनी समोर येऊन तक्रारी दाखल कराव्यात असं आवाहन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केलं आहे.

कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारा 'बार्शीचा हर्षद मेहता' विशाल फटेचे एकुण सहा बँकांमध्ये आर्थिक व्यवहार चालत होते. सहापैकी सर्वात जास्त उलाढाल असलेल्या तीन राष्ट्रीयकृत बँकांमधील खाती (Bank Acccounts) पोलिसांनी गोठवली आहेत. तर बाकीच्या तीन बँकांमध्ये किरकोळ व्यवहार दिसून आले आहेत. सर्व बँकांचे स्टेस्टमेंट काढुन घेण्यात आलेले आहेत.

लोकांची फसवणूक करण्याचा किंवा देश सोडून पळून जाण्याचा माझा कोणताही उद्देश नव्हता. मात्र मी पैसे जमा करण्यासाठी काही दिवस बाहेर असल्याने लोकांनी अफवा पसरवल्या, असा दावाही विशाल फटे याने केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT