पुणे : अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या विशाल फटे (Vishal Phate) याच्याबाबत अनेक धक्कादायक बाबी समोर येऊ लागल्या आहेत. शिक्षण बीएपर्यंतच झाले असतानाही तो एमबीएचे शिक्षण घेतल्याचे सांगत असे. फटे याने गोव्यात काही काळ हमाली केली होती आणि नंतर बार्शीत येऊन लोकांना गंडा घालू लागला, अशी बाब आता समोर आली आहे.
फटे हा शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गोव्यात हमाली करीत होता, अशी माहिती त्याच्या निकटवर्तीयांकडून समोर येत आहे. गोव्यातून बार्शीत परतल्यानंतर त्याने अनेकांना मोठे होण्याची स्वप्ने दाखवली. फाडफाड इंग्रजी बोलून तो समोरच्या व्यक्तीवर छाप पाडत असे. अशा प्रकारे दामदुप्पट पैसे करण्याच्या आमिषाने कोट्यवधींची माया गोळा केली. आता तो 9 जानेवारीपासून फरार असून, त्याने अनेकांची झोप उडवली आहे.
सुमारे 500 कोटींच्या फसवणुकीचा अंदाज
फटेच्या फसवणुकीचा प्रताप केवळ बार्शी तालुक्यापुरता मर्यादित राहिला नसून, इतर तालुक्यांसह राज्यभरातील लोकांच्या तक्रारी आता येऊ लागल्या आहेत. आतापर्यंत ७६ जणांनी तक्रार दिली असून, फसवुणकीचा आकडा १८ ते १९ कोटींच्या घरात गेला आहे. मात्र, त्याने राज्यभरात अनेकांना गंडविल्याने सुमारे ५०० कोटी रुपयांपर्यंतची फसवणूक झाल्याची चर्चा आहे. विशाले फटे यांनी जादा परताव्याच्या अमिषाने राज्यातील इतर जिल्ह्यांत कमिशन एजंट नेमून पैसे गोळा केले असल्याचे समोर येत आहे.
मुक्त विद्यापीठातून बीएची पदवी
फटे याने यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बीएची पदवी संपादन केले आहे. त्याला इंग्रजी बऱ्यापैकी बोलता येत होते. शेअर मार्केटची माहितीही त्याने जमवली होती. त्याच आधारे त्याने लोकांकडून पैसे जमवण्यास सुरूवात केली. यावेळी त्यांनी काही प्रसिध्द लोकांसोबतचे फोटोही गुंतवणूक करणाऱ्यांना दाखवायचा. त्यातच त्याला मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांच्या हस्ते एका माध्यम समूहाचा पुरस्कार मिळाला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.