Vishal Patil meet prakash Ambedkar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Vishal Patil : विशाल पाटलांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; म्हणाले, '...मी आयुष्यभर विसरू शकणार नाही'

Roshan More

Vishal Patil News : सांगली लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी विजय मिळवला. काँग्रेसमध्ये असताना त्यांनी बंडखोरी केली. विशाल पाटील यांना वंचित बहुजन आघाडीने पाठींबा दिला होता. आज (शुक्रवारी) विशाल पाटील यांनी 'वंचित'चे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेत त्यांचे आभार व्यक्त करत त्यांचा सत्कार केला.

निवडणुकीतील विजयानंतर विशाल पाटील यांनी आपला पाठींबा काँग्रेसला जाहीर केला असला तरी वंचितेन त्यांना निवडणुकीत दिलेल्या पाठींब्या बद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.

विशाल पाटील Vishal Patil यांनी आज प्रकाश आंबेडकर यांची भेट घेत त्यांचा फेटा बांधून आदर सत्कार केला. शिवाय माझ्यासाठी त्यांनी जे केलं ते मी आयुष्यभर विसरू शकणार नाही, असे देखील आपल्या सोशल मीडियातून सांगितले.

विशाल पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील आणि भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांचा पराभव केला. तिरंगी लढतील संजयकाका पाटील सहज जिंकतील, अशी चर्चा होती. मात्र, विशाल पाटलांनी विजय मिळवत सर्वांना धक्का दिला.

दिल्लीत सोनिया गांधींची भेट

विशाल पाटील यांनी आपल्या विजयानंतर आपला पाठींबा काँग्रेसला Congress जाहीर केला. आपल्या पाठींब्याचे पत्र दिल्लीत जात काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडे सुपूर्द केले. तसेच सोनिया गांधी, राहुल गांधी यांची भेट घेतली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT