Sangli News : राज्यात एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील भाजपच्या वाटेवर असणाऱ्या चर्चा सुरू आहेत. या चर्चांनी राज्याच्या राजकारणात धुरळा उडवून दिली आहे. अशाच वेळी सांगलीत जिल्ह्यात त्यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप विरोधी एकजुटीची चर्चाही जोर धरत आहे. माजी आमदार विलासराव जगताप यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या समोर तसा प्रस्ताव ठेवला होता. त्यानंतर त्यांनी खासदार विशाल पाटील यांच्याशी चर्चा केली. ‘त्यांचा निरोप मी आमदार विश्वजीत कदम यांना पाठवला आहे’, अशी माहिती खासदार पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली.
संख (ता. जत) येथे बसवराज पाटील यांच्या पुतळा अनावरण समारंभात विलासराव जगताप यांनी ‘झाले गेले विसरून जयंत पाटील यांनी भाजप विरोधी लोकांची मोळी बांधावी’, असे आवाहन केले होते. याच आवाहनाला काँग्रेस खासदार विशाल पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
जगतापसाहेब परखड व उघड बोलणारे आहेत. त्यांनी आपल्या प्रस्तावावर थेट माझ्याशी चर्चा केलीय. भाजप राज्यात ज्या पद्धतीने जनतेची फसवणूक करून सत्तेत येत आहे, ते चिंताजनक असल्याचे विशाल पाटील म्हणाले.
तसेच सांगली जिल्ह्यात बीडसारखी अवस्था होऊ नये, यासाठी विरोधी विचाराच्या लोकांनी एकत्र येण्याची गरज आहे. राजकीय आणि वैचारिक विरोध बाजूला ठेवून सर्वांना एकत्र यावे, असे त्यांना वाटते. अर्थात, तो प्रस्ताव कोणत्या निवडणुकांसाठी आहे की नाही यावर अद्याप चर्चा झालेली नाही.
विश्वजीत यांचे मावसबंधू माजी आमदार विक्रम सावंत हे जतमध्ये जगतापसाहेबांचे विरोधक आहे. त्यांनी एकमेकांचा पराभव केला आहे. त्यामुळे विश्वजीत कदम यांची भूमिकादेखील महत्वाची आहे. मी त्याबाबत विश्वजीत कदम यांना निरोप पाठवला आहे. जयंतराव आणि आम्ही जिल्हा बँक, बाजार समितीत एकत्र आहोतच, पुढे काय होते पाहू
जत दुष्काळाला वसंतदादा कारणीभूत असल्याच्या आमदार गोपीचंद पडळकर यांच्या अप्रत्यक्ष टीका केली होता. त्याला विशाल पाटील यांनी उत्तर दिले आहे. विशाल पाटील यांनी, पडळकरांनी ही माहिती कोणत्या गुगल खात्यातून मिळवली याची माहिती नाही. तर बिरोबाची खोटी शपथ घेणाऱ्याला जनता गांभिर्याने घेत नाही, आम्हीही घ्यायचे बंद केलय, असा टोला पडळकरांना लगवाला आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी 17 फेब्रुवारी रोजी इस्लामपूर दौऱ्यावर येत आहेत. यामागे राजकीय कारण असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. यावर देखील विशाल पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गडकरी यांच्या दौऱ्याचा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही. ते चांगल्या कार्यक्रमांना नेहमी येतात. ते आपल्या कामात भेदाभेद करत नाहीत. पण गडकरी पंतप्रधान होणार असतील तर मराठी माणूस म्हणून आपला पहिला पाठींबा असेल असेही त्यांनी म्हटलं आहे. तर जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना फाटा दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.