Jayant Patil : जयंत पाटलांच्या भाजपप्रवेशाबाबत कार्यकारी प्रदेशाध्यक्षांचे मोठे विधान; ‘ऑपरेशन लोट्‌स’चे संकेत

Ravindra Chavan's Big Statement : आपने दिल्लीमध्ये भ्रष्टाचार केला होता. हा भ्रष्टाचार सर्व जनतेला माहिती झाला आहे. जनता त्यांच्या भ्रष्टाचाराला वैतागली होती आणि म्हणून भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं आहे
Jayant Patil-Nitin Gadkari-Ravindra Chavan
Jayant Patil-Nitin Gadkari-Ravindra ChavanSarkarnama
Published on
Updated on

Pune, 08 February : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अशातच भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सांगली दौऱ्यावर येत असून या दौऱ्यादरम्यान जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाबाबत चर्चा होऊ शकते, असं बोललं जात आहे. त्यावर आता भाजपचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.

दिल्लीमध्ये भाजपने प्रचंड असं यश मिळवलं आहे. दिल्लीतील भाजपच्या यशाचा पुण्यातील पदाधिकाऱ्यांनी जल्लोष करून आनंदोत्सव साजरा केला. त्यावेळी भाजपचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) उपस्थित होते. यानंतर त्यांनी माध्यमंशी संवाद साधला. चव्हाण म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश पुढे जाताना दिसत आहे. त्यामुळे सामान्य जनतेमध्ये पॉझिटिव्ह वातावरण आहे. शेतकरी, कष्टकरी यांना नरेंद्र मोदींचे दिल्लीतील सरकार सातत्याने त्यांना आधार देण्याचे काम करत आहे.

विरोधकांनी कितीही फेक नरेटिव्ह सेट केले तरी देशाचं भविष्य आता भारतीय जनता पार्टी (BJP) आहे. हे आता जनतेला समजलं असून त्यामुळेच दिल्लीमध्ये 27 वर्षांनंतर भाजपला यश मिळालं आहे. मोदींचे सरकार अतिशय पारदर्शकपणे काम करत आहे. मात्र, दुसरीकडे आपने दिल्लीमध्ये भ्रष्टाचार केला होता. हा भ्रष्टाचार सर्व जनतेला माहिती झाला आहे. जनता त्यांच्या भ्रष्टाचाराला वैतागली होती आणि म्हणून भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं आहे, असा दावा रवींद्र चव्हाण यांनी केला.

Jayant Patil-Nitin Gadkari-Ravindra Chavan
Delhi Assembly Result : भाजपचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवारांनी सांगितले दिल्लीतील ‘आप’च्या पराभवाचे नेमके कारण

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील मतदानाचा दाखला देत निवडणूक आयोगावर टीका केली आहे. त्याबाबत चव्हाण म्हणाले, एक्झिट पोल सांगत होता की भाजपला दिल्लीत बहुमत मिळणार आहे. म्हणून राहुल गांधी यांनी काल ती प्रेस घेतली. कुणावर तरी खापर फोडलं पाहिजे; म्हणून राहुल गांधींनी ती प्रेस होती, त्यामुळे राहुल गांधी यांच्या विधानाकडे दुर्लक्ष करणे आवश्यक आहे.

Jayant Patil-Nitin Gadkari-Ravindra Chavan
NCP on Delhi Election : इंडिया आघाडी असती तर..! शरद पवारांच्या नेत्यानं सांगितलं 'आप'च्या पराभवाचं कारण

जयंत पाटील भाजपच्या संपर्कात आहेत का? या प्रश्नावर रवींद्र चव्हाण म्हणाले, प्रत्येक कार्यकर्त्याला हेवा वाटेल, असं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. त्यांच्या कामाचे आकर्षण प्रत्येकाला आहे, त्यामुळे प्रत्येकाला भाजपचे आकर्षण वाटत आहे, त्यामुळे आगामी काळात अशी आकर्षण भाजपकडे येतील, असा सूचक इशारा चव्हाण यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com