Vishal Patil News  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Vishal Patil News : विशाल पाटलांंचा आघाडीला अल्टिमेटम; उद्धव ठाकरे म्हणतात, "गद्दारी रोखावी..."

Sangli News Lok Sabha Election 2024 : वेगळ्या चिन्हावर काँग्रेसचाच खासदार निवडून येणार असल्याची वल्गना करत विशाल पाटील यांनी महाविकास आघाडीपुढे आव्हान निर्माण केले आहे.

Chetan Zadpe

Sangli News : सांगली लोकसभा मतदारसंघात जोरदार राजकीय घमासान घडून येत आहे. एकीकडे ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेतून चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केली होती, तर दुसरीकडे नाराज झालेले काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी बंडाचे निशाण फडकावत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तसेच येथून वेगळ्या चिन्हावर काँग्रेसचाच खासदार निवडून येणार असल्याची वल्गना करत विशाल पाटील यांनी महाविकास आघाडीपुढे आव्हान निर्माण केले आहे. यामुळे आता सांगलीत ठाकरेंपुढे बंडखोरीची डोकेदुखी निर्माण झाली आहे. (Lok Sabha Election 2024)

बंडखोरीच्या तयारीत असलेले नाराज विशाल पाटील म्हणाले, "शिवसेना म्हणते आमचं चिन्ह चोरून नेलं, राष्ट्रवादीही म्हणते आमचं चिन्ह नेलं. सांगलीकरांचंही तेच भांडण आहे. काँग्रेसचं चिन्ह तुम्ही नेऊ पाहताय. तुम्ही आम्हाला चिन्ह दिलं नाही, पण वेगळ्या चिन्हावर या ठिकाणी काँग्रेसचाच खासदार निवडून येणार, अपक्ष उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे. आता माघार घ्यायची ती महाविकास आघाडीने घ्यायची आहे. आणि 19 तारखेपर्यंत एबी फॅार्म आमच्या उमेदवारी अर्जाला जोडावा, असा खुला इशाराच विशाल पाटील यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विशाल पाटलांच्या या बंडखोरीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सावध पवित्रा घेतला आहे. "महाविकास आघाडीचं जागावाटप आता झालेलं आहे. आघाडीतल्या तीनही पक्षांनी, सर्व मित्रपक्षांनी अधिकृत पत्रकार परिषद घेऊन जागावाटप जाहीर केलेलं आहे. जर आता बंडेखोरी आणि गद्दारी होत असेल तर त्या त्या पक्षांची जबाबदारी आहे की, ही बंडखोरी थांबवली पाहिजे. पण मला नाही वाटत आता बंडखोरी झाली तर जनता त्याला स्थान देईल," असे ठाकरे म्हणाले.

विशाल पाटील चुकीची भूमिका घेणार नाहीत - संजय राऊत

"लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये कुणीही निवडणुका लढवू शकतो. विशाल पाटील हे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत. माजी मुख्यमंत्री वसंदादा पाटलांचे नातू आहेत. ज्यांनी कधीच काँग्रेसशी बेईमानी केली नव्हती. उमेदवारी हा वेगळा विषय आहे. त्यामुळे काँग्रेसशी जी परंपरा आहे, त्या परंपरेला तोडून ते वेगळी भूमिका घेणार नाहीत, असे संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT