अनिल कदम
Sangali News : आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षाने सुरू केली आहे. सांगली लोकसभा निवडणुकीसाठी भाजप व काँग्रेसने तयारी सुरू केली आहे. त्यावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. लोकसभेसाठी काँग्रेसकडून इच्छुक असलेले विशाल पाटील यांनी निवडणुकीसाठी सर्वेक्षण सुरू केले आहे. त्यावरून विशाल पाटील यांनी शेवटपर्यंत निवडणूक लढवावी, मैदानातून पळ काढू नये, असे आव्हान खासदार संजयकाका पाटील यांनी दिले होते. त्याला उत्तर विशाल पाटील यांनी दिले आहे.
वसंतदादा पाटील यांच्या संस्कृती व विचाराचे आम्ही आहोत, त्यामुळे पळ काढण्याचा किंवा भाजपबरोबर जाण्याचा प्रश्नच येत नाही. लोकसभेची निवडणूक लढणार असून ती जिंकणारच. देव-महाराजांच्या नावावर कारखाने दुप्पट करता येतात. पण या निवडणुकीत खासदारांचा पराभव निश्चित असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी व्यक्त केला.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशाल पाटील यांनी संपर्क कार्यालय सुरू केले आहे. यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील, माजी महापौर किशोर जामदार, सिकंदर जमादार, पी. एल. रजपूत, उदय पवार यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
विशाल पाटील म्हणाले, जिल्ह्यात वातावरण बदलत चालले आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळाले. लोकसभा मतदारसंघातील तीन तालुके बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील आहेत. काँग्रेस आघाडीला 75, तर भाजप आघाडीला केवळ 25 टक्के मते मिळाली आहेत. देशात व राज्यात भाजपचे सरकार आहे. खासदार व सांगली, मिरजेतील दोन्ही आमदारदेखील भाजपचे आहेत. खांद्यावर हात टाकून गोड बोलून फसविण्याचे काम खासदारांकडून सुरू आहे, मात्र हे आता चालणार नाही. त्यामुळे भाजपमध्ये जाणार असल्याचा खोटा प्रचाार सुरू झाला आहे. आम्ही असा विचार कधी करणार पण नाही. कधीही भाजपच्या नेत्यांना भेटलो नाही किंवा माझ्यावतीने कोणी भेटले नाही.
दादांचा विचार भाजपच्या विचारांपेक्षा मोठे आहेत. आमच्यावर त्यांचे संस्कार आहेत. त्यामुळे भाजपचा कधीही विचार आमच्याकडून होणार नाही. काँग्रेस पक्षाने आम्हाला भरपूर दिले आहे. आता पक्षाला अडचणीच्या काळात आमची गरज आहे. त्यामुळे आम्ही काँग्रेसबरोबरच आहे. खासदार-आमदार व्हावे, असे आमचे काही नाही. दादा घराणे नेहमी जनतेचे काम करत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. घरात बैठक घेऊनच आम्ही निर्णय घेत आहे. आमदार विश्वजीत कदम यांच्याबरोबरदेखील आता वाद उरले नाहीत. यापुढे एकत्रित भाजपच्या विचाराशी आम्ही लढत असल्याचे त्यांनी सांगितले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
खासदारांना उमेदवारी मिळते की नाही? हे त्यांनी पाहणे आवश्यक आहे. त्यांनी दुसर्याची काळजी करू नये. देव-महाराजांच्या नावावर कारखाने दुप्पट करता येतात. दोनचे चार होतात. पण या निवडणुकीत त्यांना यश मिळणार नाही. नुकताच खासदारांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला, पण या वाढदिवसाला एकाही माजी नगरसेवकाने त्यांचे डिजिटल लावले नाही. यावरून त्यांनी ओळखून घ्यावे, असा टोला विशाल पाटील यांनी लगावला.
यावेळी माजी नगरसेवक अय्याज नायकवडी, सुभाष खोत, संतोष पाटील, अभिजित भोसले, किशोर जामदार, सिकंदर जमादार, उदय पवार, संजय मेंढे आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी करण जामदार, विजय धुळूबुळू, शशिकांत नागे, अमर निंबाळकर, अमित पाटील, राजेश नाईक, दिलीप पाटील, बिपीन कदम, कुमार पाटील, शुभांगी साळुंखे, रोहिणी पाटील, आरती वळवडे आदी उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काहीजण अफवा पसरवत आहेत. पण काँग्रेसचे उमेदवार विशाल पाटीलच (Vishal Patil) आहेत. त्यांनी आता अभ्यास करावा. सर्वांना बरोबर घेऊन काम केल्यास निश्चितच विजय आपला होईल. कार्यकर्त्यांनी आता अफवांकडे लक्ष न देता कामाला लागावे, असे आवाहन जयश्री पाटील (Jayshree Patil) केले.
(Edited by Sachin Waghmare)
R...