पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काल (12 जानेवारी) नाशिकमध्ये (Nashik) राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन केले. त्यावेळी केंद्रीय युवा व क्रीडामंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) उपस्थित होते. त्यांनी वेळेचे भान राखत हजारो युवकांशी संवाद साधत भाजपशी जोडण्याचे काम केले. त्याचवेळी अजित पवार (Ajit Pawar) गटाचे नेते आणि मंत्री यांनी कार्यक्रमापासून दुरावा राखणे पसंत केल्याची चर्चा आहे.
केंद्रीयमंत्री आणि भाजपनेते अनुराग ठाकूर युवकांशी संवाद साधत होते. वेळ मिळेल तेव्हा युवाग्राममध्ये हजर होत होते. हजारो युवकांसोबत सेल्फी घेतली. राज्यातून तसेच परराज्यातून आलेल्या युवकांच्या समस्या सोडवण्यासाठी ठाकूर यांनी पुढाकार घेतला. एवढेच नाही तर युवकांसोबत जेवण केले.
परराज्यातून आलेल्या युवकांच्या एका ग्रुपची त्र्यंबकेश्वरमध्ये व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे युवाग्राममध्ये पोहोचण्यास त्यांना उशीर झाला. ही बाब लक्षात घेऊन अनुराग ठाकूर यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना त्याची दखल घेण्यास सांगितले. तसेच हा प्रश्न सुटला नाही तर खासगी सचिवाचा मोबाईल क्रमांक देत मुलांना तक्रार करण्यास सांगितले. भाजपाने ज्या उद्देशाने महोत्सवाचे आयोजन केले त्यादृष्टीने केंद्रीय युवा व क्रीडामंत्री काम करीत होते.
युवकांशी जोडण्याची एवढी चांगली संधी असताना राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे (Sanjay Bansode) मात्र कार्यक्रमाच्या आयोजनात आले काय अन् गेले काय, अशीच स्थिती होती. त्यात स्थानिक पातळीवर अजित पवार गटाचा कार्यक्रमापासून दुरावा राहिला. छगन भुजबळही (Chhagan Bhujbal) कार्यक्रमापासून चार हात लांब राहिले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
वास्तविक या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी 50 कोटी रुपयांपेक्षा अधिकचा खर्च होत असून, त्यात राज्याचा मोठा वाटा आहे. भाजप पक्षवाढीसाठी धावाधाव करीत असताना राज्याच्या क्रीडामंत्र्यांनी किमान आपल्या समाधानासाठी तरी काही प्रयत्न करायला हवे होते. किंबहुना, तुम्हाला (भाजप) काय करायचे ते करा, पण आम्हाला सांभाळा, असे चित्र निर्माण करण्यास राष्ट्रवादीचे मंत्रीही हातभार लावत असल्याची चर्चा यानिमित्ताने सुरू आहे.
(Edited by Avinash Chandane)
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.