Dhananjay Mahadik -Devendra Fadnavis Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Vishalgarh Encroachment Case : विशाळगड अतिक्रमण हटावप्रकरणी महाडिकांनी घेतली फडणवीसांची भेट; केली 'ही' मागणी

Dhananjay Mahadik Meet Devendra Fadnavis : हिंसाचार घटनेनंतर कोल्हापूर जिल्हा पोलिस प्रशासनाकडून आतापर्यंत 30 जणांना ताब्यात घेतले असून माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह 500 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Rahul Gadkar

Kolhapur, 19 July : विशाळगडावरील अतिक्रमण हटाव मोहिमेसाठी 14 जुलै रोजी झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यावरून राज्यात आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. मात्र, आंदोलनात सहभागी असलेल्या काही तरुण शिवभक्तांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. सामाजिक शांतता राखण्यासाठी आणि त्या तरुणांचे भवितव्य लक्षात घेऊन, राज्य सरकारने संबंधित शिवभक्त तरुणांवरील गुन्हे तातडीने मागे घ्यावेत, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून केली आहे.

माजी खासदार संभाजीराजे (Sambhajiraje) यांच्या उपस्थितीत विशाळगडावरील अतिक्रमण हटविण्यासाठी आंदोलन करण्यात आले होते. मात्र, त्या आंदोलनादरम्यान गडाच्या पायथ्यालगतच्या वस्तीतील मुस्लिम वस्तीत तोडफोड करण्यात आल्याचा आरोप होत आहे. त्या वरून सध्या राज्यात राजकीय पक्षांमध्ये कलगीतुरा रंगला आहे.

त्या घटनेनंतर कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती (Sahu Maharaj) आणि माजी मंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी गडावर जाऊन पाहणी केली. त्यावेळी उपस्थितांनी त्या दिवशी घडलेला इतिवृत्तांत त्यांना कथन केला. तसेच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही गुरुवारी तोडफोड झालेल्या ठिकाणी पाहणी केली. त्यांनी सरकारी मदतीचे आश्वासन दिले आहे.

दरम्यान, खासदार धनंजय महाडिक यांच्या मागणीला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. संपूर्ण घटनेची पूर्ण माहिती घेऊन, कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, असे अभिवचन गृहमंत्री फडणवीस यांनी दिले आहे. त्यामुळे विशाळगड अतिक्रमण हटाव आंदोलनात सहभागी असलेल्या हिंदू शिवभक्त कार्यकर्त्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

हिंसाचार घटनेनंतर जिल्हा पोलिस प्रशासनाकडून विविध पातळीवर तपास सुरु आहे. घटनेदरम्यानचे व्हिडिओ तपासून संशियांचे ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. आतापर्यंत 30 जणांना ताब्यात घेतले असून माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह 500 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT