Nashik Political News : उपमुख्यमंत्री अजित पवार वाढवणार शिंदे गटाचे टेन्शन ?

Loksabha Election : नाशिक लोकसभेसाठी महायुतीमध्ये स्पर्धा...
Ajit Pawar, Eknath Shinde
Ajit Pawar, Eknath ShindeSarkarnama

Nashik Political News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (अजित पवार गट) उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात लोकसभा निवडणुकीची चर्चा होऊ शकते. त्यामुळे उपमुख्यमंत्री पवार आज नाशिक मतदारसंघाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे टेन्शन वाढवणार की दिलासा देणार, याची उत्सुकता आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघात 2019 मधील निवडणुकीत शिवसेनेचे हेमंत गोडसे निवडून आले होते. शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर गोडसे यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात प्रवेश केला. त्यामुळे महायुतीच्या राजकारणात नाशिक मतदारसंघावर शिंदे गटाने दावा केला आहे. खासदार गोडसे यांनी सध्या निवडणुकीच्या तयारीवर भर दिला असून त्यांचे विविध दौरे सुरू आहेत.

Ajit Pawar, Eknath Shinde
MNS Politics : राज ठाकरे चिडले अन्...

या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये राष्ट्रवादीचे अजित पवार (Ajit Pawar) सहभागी झाले आहेत. त्यांनी प्रारंभी बारामतीसह चार लोकसभा मतदारसंघांवर दावा केला होता. त्याचे पक्षांतर्गत पडसाद उमटले. नंतरच्या काळात अनेक मतदारसंघांमध्ये अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मतदारसंघावर दावा केला आहे. यामध्ये नाशिक मतदारसंघाचादेखील समावेश आहे.

अजित पवार गटाचे पदाधिकारी निवृत्ती अरींगळे यांसह विविध पदाधिकारी नाशिक मतदारसंघात इच्छुक उमेदवार आहेत. त्यांनी यापूर्वीच उपमुख्यमंत्री पवार यांची भेट घेऊन उमेदवारी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आज उपमुख्यमंत्री नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात पदाधिकारी आणि कार्यकर्ते लोकसभा निवडणुकीबाबत नाशिक मतदारसंघाची मागणी करण्याची शक्यता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अरिंगळे यांनीदेखील त्याला दुजोरा देत पक्षातील बहुतांश पदाधिकारी नाशिक मतदारसंघात उमेदवार असावा, या मताचे आहेत. सिन्नर आणि देवळाली येथील आमदार अजित पवार गटाचे आहेत. शहरातील तीनही आमदार सहकारी पक्ष भाजपचे आहेत. महायुतीला अतिशय अनुकूल वातावरण असल्याने अजित पवार गटाकडून नाशिक मतदारसंघात उमेदवार देण्याचा आग्रह आहे, असे सांगितले.

उपमुख्यमंत्री पवार यांच्या दौऱ्यात नाशिक लोकसभा मतदारसंघाबाबत काय चर्चा होते, कोणती घोषणा होते, हे राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने नाशिक मतदारसंघावर दावा केल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे टेन्शन वाढणार आहे, त्यामुळे अजित पवार यांचा दौरा लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने किती महत्त्वाचा ठरतो याकडे लक्ष आहे.

(Edited by Amol Sutar)

Ajit Pawar, Eknath Shinde
BJP Politics : गुजरात भाजप नेत्याच्या कन्येचे गिरीश महाजनांना आव्हान ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com