Vishwajeet Kadam News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Vishwajeet Kadam News : सांगलीची जागा काँग्रेसच लढवणार आणि जिंकणारही; विश्वजीत कदमांचा विश्वास

सरकारनामा ब्यूरो

Sangli News : भाजपला अगामी लोकसभा निवडणुकीत धक्का देण्यासाठी काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे. राज्यात काँग्रेस नेते आक्रमक झाले आहेत. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यभर बैठकांचे सत्र सुरू आहे. काँग्रेसचे नेते माजी मंत्री विश्वजीत कदम (Vishwajit Kadam) यांनी काँग्रेसची भूमिका चवताळलेल्या वाघासारखी असल्याचे स्पष्ट केले. राज्यातली सध्याची परिस्थिती पाहता काँग्रेस आक्रमक झाल्याचे त्यांनी सांगितले.

कदम यांनी हातकणंगले आणि सांगली (Sangli) लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यानंतर ते बोलत होते. कदम म्हणाले, लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला सध्या चांगले वातावरण आहे. त्यामुळे आम्ही तयारी करत आहोत. सरकारच अपयश लोकांपर्यंत पोहचवत आहोत. सांगली लोकसभा मतदारसंघातही पक्षाला चांगले वातावरण आहे. सांगलीची जागा काँग्रेसच (Congress) लढवेल आणि विजयी मिळवेल, असा दावा त्यांनी केला.

सत्ताधारी आमदारांना जास्त निधी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांना कमी निधी देणे हा चुकीचा पायंडा असल्याचेही ते म्हणाले. यामुळे लोकांवर अन्याय होणार असल्याचेही सांगत त्यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर टीका केली. तालुक्यातील जवळपास ८० टक्के बूथ कमिट्या पूर्ण झाल्या आहेत. केंद्र आणि राज्य स्तरावर देण्यात येणारे सर्व उपक्रम, योजना, मोहिमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत असल्याचेही कदम यांनी सांगितले.

सांगली आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. यावेळी वाळवा व शिराळा तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या सर्व कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी आमदार मोहनशेठ कदम, काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत, हातकणंगले लोकसभा निरीक्षक रणजित देशमुख, प्रदेश सदस्य नंदकुमार कुंभार, शिराळा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रवी पाटील, शहराध्यक्ष राजेंद्र शिंदे, आनंदराव पाटील, युवक काँग्रेस अध्यक्ष उदय थोरात उपस्थित होते.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT